राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोंभुर्णा येथे आदिवासी मेळावा
चंद्रपूर,दि.30 : शासकीय विभागांमार्फत
जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती नागरिकांना होण्याच्या
दृष्टीने 1 ऑक्टोबर 2024 रोजी पोंभुर्णा येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.
राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील.
पोंभुर्णा – मुल रोडवर असलेल्या तालुका
क्रीडा संकूल, पोंभुर्णा येथे 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता आदिवासी
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात
आले आहेत. तसेच सदर कार्यक्रमात आदिवासी बांधवांकरीता योजनांचे वाटप, गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून विधानसभेचे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामेदव किरसान, प्रतिभा धानोरकर,
आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तिकुमार भांगडीया, सुभाष धोटे,
किशोर जोरगेवार, पोंभुर्णाच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे, आदिवासी विकास विभागाचे
अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी
अधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित राहणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार
यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment