Search This Blog

Monday 2 September 2024

अल्पसंख्यांक समुदायातील ‍‍विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 अल्पसंख्यांक समुदायातील ‍‍विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

चंद्रपूरदि. 2 : परदेशामध्ये उच्च  शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अटी  व शर्ती  : 1. विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2. पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. 3. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. 4. पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. 5. पदव्युत्तर पदवीसाठी 3 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो ताथापि कोणत्याही  परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. 6. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील.

7. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा  लाभ देता येईल, त्यापेक्षा  जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे  बंधनकारक  असेल. एका  वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटुंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतीम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील  दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. 8. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उर्त्तीण केलेला असावा. 9 परेदशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QSWordUniversity Rank) 200 च्या आत असावी.

सदर योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यास पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उर्त्तीण होणे  बंधनकारक  असून त्यासाठी शैक्षणिक संस्था/ विद्यापीठाचे  प्रमाणपत्रगुणपत्रिकाप्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करावे.

अटी व शर्ती  ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील. सदरील वेबसाईट वरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 6 सप्टेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय3 चर्च रोडपुणे - 411001 येथे सादर करावा. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती  देण्यात येईल. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment