Search This Blog

Saturday 7 September 2024

पूर परिस्थितीमुळे शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे येत्या चार दिवसात होणार पूर्ण

 

पूर परिस्थितीमुळे शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे येत्या चार दिवसात होणार पूर्ण

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश

चंद्रपूरदि.07:  चंद्रपूर तालुक्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील मारडापिपरीशिवनी चोरवढाबोर रिठआरवट या गावातील शेतीचे तसेच नदीलगतच्या 12 गावांमध्ये अंदाजे 1281 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून 1005 शेतकरी बाधित झाले आहे. पिकांचे झालेले नुकसानघरांची पडझडपशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेवून यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले होते.

त्या अनुषंगानेप्रशासनाने शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून सदर पंचनामे येत्या 4 दिवसात पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment