Search This Blog

Saturday, 14 September 2024

ईद-ए-मिलाद निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी सुट्टी



 ईद-ए-मिलाद निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

चंद्रपूर दि. 14 : ईद-ए-मिलाद हा सण मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने सोमवार दि.16 सप्टेंबर 2024 रोजी जुलूसचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजीची ईद-ए-मिलाद ची सुट्टी कायम ठेवली आहे. सर्व नागरिकांनी समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवून आनंदाने सण साजरा करावा,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment