Search This Blog

Wednesday 4 September 2024

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत

 

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत

Ø आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी

Ø मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीयजिल्हा प्रशासनाला सूचना

मुंबई / चंद्रपूरदि. 4 : मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

पिकांचे झालेले नुकसानघरांची पडझडपशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावीयासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावीअशा सूचना दिल्या आहेत.

विभागीय आयुक्तजिल्हा प्रशासनआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभागस्थानिक नगरपालिकामहानगरपालिकाग्रामपंचायतीपोलीस प्रशासन आदी सर्वांनी समन्वयाने यासाठी कामकाज करावेअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवावायाद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण करावेस्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेतत्यांना कपडेअन्नशुद्ध पाणीऔषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावाअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पाटबंधारे विभागहवामान खाते यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना  आवश्यक माहिती त्वरित द्यावी.

आपतग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर पाऊस परिस्थितीबाधित क्षेत्रधरणांमधील पाणी पातळीस्थलांतरित लोकांची संख्याझालेल्या नुकसानीची माहिती इत्यादी माहिती त्वरित वेळोवेळी सादर करावीअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

००००००

No comments:

Post a Comment