Search This Blog

Thursday 5 September 2024

स्वाधार योजनेसाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

स्वाधार योजनेसाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 5 : सन 2024-25 पासून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता एकत्रित ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टल https://hmas.mahait.org अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. 

शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ज्या पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी निवड शासकीय वसतिगृहास झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जातील. तसेच नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयाच्या लॉगईन वर अग्रेषित केले जातील. सदर माहिती पोर्टलवरील लॉगीन मध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपूर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment