Search This Blog

Saturday, 21 September 2024

जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छता उपक्रम

 




जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छता उपक्रम

Ø अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश

चंद्रपूरदि. 21सुंदर माझा परिसरसुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेवर आधारीत तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांनी सहभाग घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयव तहसील कार्यालयचंद्रपूर येथे जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात श्रमदानाव्दारे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी सुंदर माझे कार्यालय अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेआपल्या कार्यालयाचा परिसर तसेच आपल्या कार्यालयातील बैठक व्यवस्थेच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावीजेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी केलेल्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

सदर मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवारउपजिल्हाधिकारी (भूसंपादन) दगडू कुंभार,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकरचंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवारतहसीलदार (संगायो) सीमा गजभियेतहसीलदार (सामान्य) प्रिया कवळेअधीक्षक पल्लवी आखरेनायब तहसीलदार राजू धांडेजितेंद्र गादेवारगिता उत्तरवारज्योती कुचनकरकनिष्ठ अभियंता श्री. भट्टड यांच्यासह सहायक करमणूक कर अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयउपविभागीय अधिकारी कार्यालयतहसील कार्यालयचंद्रपूर येथील सर्व कर्मचारीचंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment