Search This Blog

Wednesday 4 September 2024

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 390 मतदान केंद्रावर मतदार यादी प्रसिध्द

 

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 390 मतदान केंद्रावर मतदार यादी प्रसिध्द

चंद्रपूरदि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित  ‍विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार तयार करण्यात आलेली 71-  चंद्रपूर विधानसभा मतदार संघाची प्रारुप अंतिम मतदार यादी मतदारांना पाहण्यासाठी 390 मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संबंधित मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सदर यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

71- चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील एकूण सर्व  मतदान केंद्रावर मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत पाहण्याकरिता मतदान केंद्रावर उपलब्ध असेल. तसेच या मतदार संघातील मतदान केंद्रे पुनर्रचित करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या स्थानामध्ये बदल करण्यात आला आहे. काही मतदान केंद्राच्या नावात बदल आहेकाही नवीन मतदार केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत्यासह 5 मतदान केंद्राचे विलीनीकरण करण्यात आलेले आहेत. तसेच सदर मतदान केंद्रामध्ये 1350 च्यावर मतदार असल्यामुळे ज्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी गर्दी होते, त्या ठिकाणचे अतिरिक्त मतदार इतर जवळच्या त्याच इमारती मध्ये असलेल्या मतदान केंद्रास जोडलेले आहे.

करिता सर्व मतदारांनी मतदार यादीचे अवलोकन करून मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याबाबतची खात्री करून घ्यावी. नवीन मतदारांनी आपली नावे https://Voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने नमुना 6 अर्ज भरून मतदार यादीत समाविष्ट करता येईल. तसेच दुरुस्ती व इतर करिता नमुना 8 अर्ज भरता येईल, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment