Search This Blog

Tuesday, 24 September 2024

चंद्रपूर जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायती क्षयमुक्त

 

चंद्रपूर जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायती क्षयमुक्त

चंद्रपूरदि.24 : राष्ट्रीय  क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम जिल्हयात राबविण्यात आला असून जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतीना क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आले आहे. क्षयमुक्त झालेल्या गावाचे सरपंच व सचिव यांचा गौरव सोहळा नुकताच कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे घेण्यात आला.    

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारेजिल्हा  शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटेलजिल्हा माता बालसंगोपन अधिकारी  डॉ. प्राची नेहुलकरजागतिक आरोग्य सल्लागार डॉ. संकेत नांदेकर उपस्थित होते.

            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 55 ग्रामपंचायतीतील सरपंच व सचिवांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. तसेच क्षयरोगापासून आपले गाव, आपला तालुका, ,आपला जिल्हा मुक्त  करण्यासाठी गावपातळीपासून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले यांनी केले. संचालन हेमंत महाजन यांनी केले.

          क्षयरोग मुक्त झालेल्या ग्रामपंचायती : नांदगाव पोडेशिवनीमानोराजुनी दहेली (बल्लारपूर तालुका)बेलगावबिजोणीचिंचोलीमुरसागुजाळा, चपराळा (भद्रावती तालुका)मरारमेठाचिखलगावहरदोलीसावलगावमुई (ब्रम्हपुरी तालुका), पिपळखुंटउसगावचेकनिवाळावरवट (चंद्रपूर तालुका)बोरगाव बुट्टीबोथली, वाहनगाव, लावारी, बोडधाहिवरानवीन  जामनीपारडपार, चिंचाळा कुणबी (चिमूर तालुका)कन्हाळगावनंदवर्धनघडोलीचेक दरुर (गोंडपिपरी तालुका), गुडेशेलासारेकसा (जिवती तालुका)बेलगावमंगलहिरानोकरी पाल (कोरपना तालुका),  बबराळाभगवानपुरआकापुर (मूल तालुका)चारगाव चक,आकापुरमिंथुर (नागभीड तालुका), दिघोरी (पोंभुर्णा तालुका)भुरकूंडा खुर्द. चिंचोली खुर्दसिंधी,भेदोडा (राजुरा तालुका)बेलगावडोनाळा (सावली तालुका)कळमगाव तुकूम,मुरमाडी (सिंदेवाही तालुका)गुंजाळापोहातुमगावसोनेगावसालोरी येन्सा ब्लॉक (वरोरा तालुका).

०००००

No comments:

Post a Comment