Search This Blog

Tuesday 17 September 2024

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती/ फ्रीशीप करीता पात्र असलेले अर्ज 30 नोव्हेंबरच्या आत पाठवावे

 

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती/ फ्रीशीप करीता पात्र असलेले अर्ज 30 नोव्हेंबरच्या आत पाठवावे

Ø चिमूर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे निर्देश

चंद्रपूरदि.17 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर या कार्यालयाच्या अंतर्गत चिमूरब्रम्हपुरीनागभिडवरोरा व भद्रावती या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना समावेश होतो. शैक्षणिक सत्र 2024-25 करीता Mahadbtmahait.gov.in हे शिष्यवृत्ती / फ्रीशीप फॉर्म  भरण्याकरीता पोर्टल सुरु झाले आहे. महाविद्यालयातील मॅट्रीकोत्तर प्रवेशित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती / फ्रीशीप चे अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून तात्काळ भरुन घेण्यात यावे व त्यासंबंधीच्या सुचना महाविद्यालय स्तरावरून विद्यार्थ्याना द्याव्यात तसेच सूचना सूचना फलकावर लावण्यात यावे. महाविद्यालयातील शिष्यवृत्ती हाताळणाऱ्या लिपीकाने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्ती/ फ्रीशीप अर्जाची व आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करावी. शिष्यवृत्ती/ फ्रीशीप करीता पात्र असलेले सर्व अर्ज पुढील कार्यवाही करीता प्रकल्प कार्यालयाच्या लॉगीनवर 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवावेत.

             शिष्यवृत्तीचे परीपूर्ण प्रस्ताव मुदतीत सादर झाले नाहीत व पोर्टल बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून  वंचित राहावे लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची  राहील. त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. महाविद्यालयाने ऑनलाईन परीपूर्ण पात्र असलेलेच अर्ज  या कार्यालयाला मंजुरीकरीता सादर करणे  आवश्यक आहे. जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्रीशीप करीता अर्ज भरावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी प्रविण लाटकर यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment