Search This Blog

Friday, 30 October 2026

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 : मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास साधणे, मत्स्त्यवसायाशी संबंधित लाभार्थ्यांना प्रोत्साहन देणे तसेच विविध घटकांना योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 ऑक्टोबर2026 पासून सुरू झाली आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र मत्स्यव्यवसायिकांनी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तसेच योजनेच्या विविध घटकांसाठी पात्र असलेल्या इतर लाभार्थ्यांनी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांची व घटकांची माहिती तपासून ऑनलाइन अर्ज सादर करावा.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया : 1. महाडीबीटी 20 पोर्टलच्या अधिकृत  संकेतस्ळाला भेट द्यावी.

2. नवीन नोंदणी करून महाआयडी तयार करावी नंतर उपलब्ध खात्याद्वारे लॉगिन करावे. 3. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती व पात्र घटक तपासावेत. 4. संबंधित घटकाची निवड करून अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. 5. पोर्टलवर मागणी केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाइन सादर करावा. 6. अर्ज सादर केल्यानंतर अर्ज क्रमांक, पोचपावती जतन करून ठेवावी आणि पोर्टलवर वेळोवेळी अर्जाची स्थिती तपासावी.

आवश्यक सूचना : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. यापोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित योजनेचे निकष, आवश्यक कागदपत्रे, अनुदानाचे नियम व अर्जाची अंतिम मुदत यांची अधिकृत पोर्टलवर खात्री करावी. अर्जामध्ये अचूक माहिती आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे अर्जाच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचण उद्भवल्यास अर्जदारांनी सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळे : 1) एनएफडीपी पोर्टल : https://nfdp.dof.gov.in/nfdp# 

2) महाडीबीटी 2.0 पोर्टल :  https://mahadbt2.maharashtra.gov.in/

चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यवसायिक, मत्स्यपालक, सहकारी संस्था व इतर संबंधित लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती घेऊन महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, स.अ. डोंगरे यांनी केले आहे.

येथे करा संपर्क : कार्यालय सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा कक्ष क्र.-11, चंद्रपूर.

००००००

No comments:

Post a Comment