Search This Blog

Monday, 6 April 2026

जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि गांभिर्याने करा - जिल्हाधिकारी वसुमना पंत



 

जनगणनेचे काम अचूकपारदर्शक आणि गांभिर्याने करा

जिल्हाधिकारी वसुमना पंत    

चंद्रपूरदि. 06 : जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. 15 वर्षांनंतर जनगणना होत असून ही संपूर्ण प्रक्रिया डिजीटल पध्दतीने करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचा-यांनी अचूक, पारदर्शकपणे आणि गांभिर्याने जनगणनेचे काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नुतन सावंत, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम (चंद्रपूर), संदीप भस्के (वरोरा), अजय चरडे (मुल), पर्वणी पाटील (ब्रम्हपुरी), अर्जुन पावरा (बल्लारपूर), किशोर घाटगे (चिमूर) यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि ठराविक वेळेत जनगणनेचे काम करणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जास्तीत जास्त शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करावी. अधिकारी – कर्मचा-यांनी जनगणनेबाबत असलेले प्रशिक्षण गांभिर्याने करावे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे या कामाचा विभागीय तसेच शासन स्तरावर नियमित पाठपुरावा होणार आहे. सर्व उपविभागीय अधिका-यांनी आपल्या अधिपत्याखालील तहसीलदार व संपूर्ण यंत्रणेचा आाढावा घ्यावा. ऑनलाईन पध्दतीने स्वत: माहिती भरण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे.

एक टीमवर्क म्हणून जनगणनेचे काम केले तर अचूक आणि पारदर्शकपणे काम होण्यास मदत होईल. अधिका-यांनी जनगणनेचा कायदा, त्यात असलेल्या तरतुदी, झालेले बदल आदी बाबी लक्षपूर्वक वाचाव्यात. तसेच या कामात स्वत: लक्ष द्यावे. केवळ कर्मचारी किंवा ऑपरेटरच्या भरोश्यावर अवलंबून राहू नये. जनगणनेचे काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असेल तर त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशाही सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात पेट्रोलडिझेल आणि गॅस सिलिंडरची उपलब्धता तसेच चंद्रपूर (ब्रम्हपुरी) – भंडारा समृध्दी महामार्गनागपूर – चंद्रपूर महामार्ग आणि वर्धा - बल्लारशहा तिसरी आणि चवथ्या रेल्वे लाईनकरीता भुसंपादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

एस.आय.आरबाबत आढावा : निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी काळात छायाचित्र मतदार याद्यांचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एस.आय. आर.) हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी  एसआयआर मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात एसआयआर मोहीम सुरू होण्यापुर्वी सर्व उपविभागीय अधिका-यांनी प्राथमिक तयारी करून ठेवावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख यांनी सादरीकरण केले.

००००००

नागभीड भुमी अभिलेख कार्यालयातून नागरिकांना नियमितपणे सेवा


 नागभीड भुमी अभिलेख कार्यालयातून नागरिकांना नियमितपणे सेवा

चंद्रपूरदि. 06 :  भुमी अभिलेख विभागाच्या बहुतेक सेवा जसे की ईमोजणीई फेरफारनक्कल अर्जमोजणी 'प्रत याबाबतच्या सेवा ऑनलाईन पध्दतीने पुरविल्या जाताततसेच इतर कार्यालयीन सेवा देखील कार्यालयातील कर्मचा-यांकडून नियमितपणे दिल्या जात आहेतसेच डिसेंबर 2025 पासून उप अधीक्षकभूमि अभिलेखनागभीड हे पद नियमित भरलेले असल्यामुळे नागरिकांना सुरळीत सेवा मिळत असल्याचे नागभीड येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक वंदना नाईक यांनी कळविले आहे.

००००००

नोंदीत सुरक्षा रक्षकांचे वेतन व भत्ते वाढबाबत नोटीस प्रसिद्ध

 नोंदीत सुरक्षा रक्षकांचे वेतन व भत्ते वाढबाबत नोटीस प्रसिद्ध

Ø 15 एप्रिलपर्यंत निवेदनेहरकती आमंत्रित

चंद्रपूरदि. 06 :  सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत  असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन व  इतर भते मे 2023 ते 30 एप्रिल 2026 या तीन वर्षाच्या कालावधीकरीता निश्चित करण्यात आले होतेसदरचा कालावधी 30 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात येत असल्याने मे 2026 पासून वेतनाच्या दरात हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचे निवेदन मंडळास प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याणअधिनियम, 1981 नुसार सर्व संबंधित नोंदीत आस्थापनासंघटनानोंदीत सुरक्षा रक्षक यांना योग्य निवेदने / हरकती मागवून वेतनाचे दर व भत्ते तसेच सेवाशर्ती निश्चित करण्याचे अधिकार मंडळास आहेतमंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतन व इतर भत्ते वाढीबाबतची नोटीसमंडळाच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात आली आहे.

मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या वेतनइतर भक्तांमध्ये वाढ करण्याबाबत निवेदने /हरकती सादर करावयाच्या असतीलत्यांनी 15 एप्रिल 2026रोजी किंवा त्यापूर्वी मंडळाच्या कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करावेत्यांनतर आलेल्या निवेदनाचा विचार करण्यात येणार नाहीअसे सहायक कामगार आयुक्त तथा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी कळविले आहे.

००००००

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


 पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 06 :  पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाली असून उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहेया योजनेच्या नोंदणीसाठी pmintemship.mca.gov.in या वेब पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावीदेशातील प्रमुख 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे,

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणेहा या योजनेचा मुख्य उद्देश आहेप्रत्येक उमेदवारांना प्रति महिना हजार रूपये देण्यात येणार असून इंटर्नशिपचा कालावधी किंवा महिने आहेभारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थी साठी विमा कवच देखील दिले जाणार आहेज्या उमेदवारांचे वय 21 ते 25 वर्ष आहेअसे पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेल्या बेरोजगार तरुणासाठी ही संधी आहे.

चंद्रपूर जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

Friday, 3 April 2026

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू




 चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू

Ø शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे

चंद्रपूरदि. 03 : भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2017 बॅचच्या असलेल्या वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि. 3) चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारचंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामउपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सन 2017 मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. या कालावधीत त्यांनी आदिवासी समाजाचे कल्याण व सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामीण विकास प्रकल्प व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

याशिवाय फलोत्पादन संचालक तसेच वनामती संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.

००००००