नोंदीत सुरक्षा रक्षकांचे वेतन व भत्ते वाढबाबत नोटीस प्रसिद्ध
Ø 15 एप्रिलपर्यंत निवेदने/ हरकती आमंत्रित
चंद्रपूर, दि. 06 : सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन व इतर भते 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2026 या तीन वर्षाच्या कालावधीकरीता निश्चित करण्यात आले होते. सदरचा कालावधी 30 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात येत असल्याने 1 मे 2026 पासून वेतनाच्या दरात 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचे निवेदन मंडळास प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 नुसार सर्व संबंधित नोंदीत आस्थापना, संघटना, नोंदीत सुरक्षा रक्षक यांना योग्य निवेदने / हरकती मागवून वेतनाचे दर व भत्ते तसेच सेवाशर्ती निश्चित करण्याचे अधिकार मंडळास आहेत. मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतन व इतर भत्ते वाढीबाबतची नोटीस, मंडळाच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात आली आहे.
मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या वेतन, इतर भक्तांमध्ये वाढ करण्याबाबत निवेदने /हरकती सादर करावयाच्या असतील, त्यांनी 15 एप्रिल 2026रोजी किंवा त्यापूर्वी मंडळाच्या कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करावे. त्यांनतर आलेल्या निवेदनाचा विचार करण्यात येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त तथा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment