Search This Blog

Tuesday, 28 April 2026

खत विक्रीतील अनियमितता ; 16 कृषी केंद्राचे परवाने निलंबित


खत विक्रीतील अनियमितता ; 16 कृषी केंद्राचे परवाने निलंबित

Ø कृषी विभागाची मोठी कारवाई

चंद्रपूरदि. 28 : जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्री मध्ये करण्यात येणाऱ्या अनियमितेची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धडक कारवाई केली आहे. 24 एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर 3 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येऊन 12 कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली.

जिल्ह्यात काही कृषी केंद्र चालकांकडून खतांच्या साठ्याबाबत आणि विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्यात्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध केंद्रांची अचानक तपासणी केली असताअनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आणि विक्रीच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आलेया तक्रारींच्या आधारे संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते.

परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीचंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुनावणी प्रक्रिया पार पडलीयावेळी प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आलीसुनावणी दरम्यान केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने 16 कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई निश्चित करण्यात आलीखत विक्रीत किंवा इतर कोणत्याही कृषी निविष्ठांच्या बाबतीत गैरप्रकार करणाऱ्या केंद्र चालकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत साठेबाजी आणि खतांच्या चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहेआगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

            परवाने निलंबन झालेले कृषी केंद्र : 1) श्रीॲग्रो ट्रेडर्सदुर्गापूर 2) शिव कृषी केंद्र,  वरोरा 3) कल्पना कृषी केंद्रवरोरा 4) आदर्श कृषी केंद्रजिबगाव (सावली) 5) धाईत कृषी केंद्रनिफंद्रा (सावली) 6) साई कृषी केंद्रसावली 7) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थागिरगाव (नागभीड) 8) देशमुख कृषी केंद्रमांगली (नागभीड) 9) सेवा सहकारी संस्थापळसगाव (नागभीड) 10) प्रभु कृपा कृषी केंद्रमेंढा (नागभीड) 11) ठेंगरे कृषी केंद्रपिंपळगाव (ब्रम्हपुरी) 12) विनोद कृषी केंद्रपिंपळगाव (ब्रम्हपुरी) 13) पवन कृषी केंद्रभद्रावती 14) समर्थ ॲग्रो एजन्सीगवराळा (भद्रावती) 15) पाथरी सेवा सहकारी संस्थापाथरी (सावली) 16) गणेश कृषी केंद्रबेंबाळ (मुल) या कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेततर 1) तिरुमला ॲग्रो एजन्सीकोरपना 2) सेवा सहकारी संस्थागेवरा बुज (सावली) 3) कास्तकार कृषी केंद्रव्याहाड खु. (सावलीया कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment