Search This Blog

Friday, 24 April 2026

चंद्रपूर जिल्ह्यात 105 रुग्णांना सुमारे 89.33 लाखांची मदत


 चंद्रपूर जिल्ह्यात 105 रुग्णांना सुमारे 89.33 लाखांची मदत

Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

चंद्रपूरदि. 24 :  शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत  मिळालेल्या पात्र  गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात 105 रुग्णांना सुमारे 89 लाख 33 हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापनापेपरलेस अर्ज प्रक्रियातातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आलेत्यासोबतच सामंजस्य करारक्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालयधर्मादाय रूग्णालयसंस्थादाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.  

मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहेपरिणामीअधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

20 गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष ते 6), हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरोहाताचेगुडघ्याचे प्रत्यारोपणहिप रिप्लेसमेंटकर्करोग शस्त्रक्रियारस्ते अपघातलहान बालकांची शस्त्रक्रियामेंदूचे आजारहृदयरोगडायालिसिसकर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधननवजात शिशुंचे आजारबर्न (भाजलेलेरुग्णविद्युत अपघात रुग्ण अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षबीपीसीएल फाऊंडेशन  टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहेया करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआरअंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहेआर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.

आर्थिक वर्षातील मदत : 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहेतरयाच कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील 105 रुग्णांना सुमारे 89 लाख 33 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील 105 गरजू रुग्णांना सुमारे 89.33 लाख रुपयांची मदत मिळाल्याने ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहेजलदपारदर्शक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे पात्र रुग्णांना वेळेत उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहेगरजूंनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी  धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment