Search This Blog

Tuesday, 21 April 2026

चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नवी झेप



चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नवी झेप

Ø माय फर्स्ट डिक्शनरी व डीजीटल वर्गखोलीचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 21 : जिल्हा परिषद व बल्लारपूर येथील पेपर मील यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडविणारा माय फर्स्ट डिक्शनरी व डीजीटल वर्गखोलीचा शुभारंभ जिप्राथमिक शाळाइटोली (ताबल्लारपूरयेथे संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंगबिल्ट ग्राफिक पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडचे युनिट हेड उदय कुकडेमहाव्यवस्थापक प्रवीण शंकरगटविकास अधिकारी धनंजय साळवेशिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनावणेउपशिक्षणाधिकारी विशाल देशमुखइटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरेग्रामसेवक विकास बोरेवार तसेच मुख्याध्यापिका पुष्पलता दरेकर उपस्थित होते.

माय फर्स्ट डिक्शनरी प्रकल्पांतर्गत 15 तालुक्यांमधील इयत्ता वी ते वी तील सुमारे 20 हजार  विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वितरण करण्यात येणार आहेया उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपदावाचन-लेखन कौशल्ये आणि भाषिक आत्मविश्वास वाढून त्यांच्या शैक्षणिक व करिअर संधींना भक्कम आधार मिळणार आहेतसेच पेपर मीलच्या सामाजिक दायित्व निधीतून इटोलीनांदगाव पोडे व विसापूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले असून स्मार्ट बोर्डसंगणक व ऑडिओ-व्हिज्युअल साधनांमुळे अध्यापन अधिक प्रभावीसंवादात्मक आणि आकर्षक झाले आहे.

हा उपक्रम पारंपरिक शिक्षण पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्णस्पर्धात्मक व भविष्योन्मुख शिक्षणासाठी सक्षम करणारा ठरणार आहे.

००००००

No comments:

Post a Comment