Search This Blog

Wednesday, 22 April 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश


 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश

Ø चिमूर प्रकल्प कार्यालयामार्फत 22 एप्रिल पासून नि:शुल्क अर्ज वितरण

चंद्रपूरदि. 22 : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता ली मध्ये प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना आहेत्याकरीता अनुसूचित जमातीच्या (आदिवासीप्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर यांच्या कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 22 एप्रिल पासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज विहीत कागदपत्रासह 23 मे 2026 पर्यंत स्विकारले जातील.

इयत्ता लीत प्रवेश घेण्याकरीता अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

1) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2) जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्रय रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमीत केलेले बीपीएल प्रमाणपत्र जोडावे. 3) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपयांपर्यंतचे असावे. 4) शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दिनांक 18 सप्टेंबर, 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 5) अर्जासोबत विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखलावैद्यकीय प्रमाणपत्रविद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडावे. 6) विद्यार्थ्यांचे पालक शासकिय / निमशासकिय नोकरदार नसावेत. 7) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकानी संमतीपत्र जोडावे व विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. 8) विद्यार्थ्यांचे पालक विधवानिराधारपरितक्ता असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडण्यात यावा. 9) निवड झालेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलता येणार नाही.         

शासन स्तरावर निवड झालेल्या शाळेत व मंजुर प्रवेश संख्येच्या अधिन राहून विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईलमंजुर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईलअसे चिमुरच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी कळविले आहे.

प्रवेश अर्ज खालील ठिकाणी निःशुल्क उपलब्ध आहेत : 1) प्रकल्प कार्यालयएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर 2) आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहचिमूरनागभिडब्रम्हपुरीवरोराभद्रावती, 3) शासकीय आश्रमशाळाचंदनखेड़ाजांभूळघाटचिंधिचककोसंबी (गवळी), 4) अनुदानित आश्रम शाळा कांपाब्रम्हपुरीएकारापळसगांवआंबोलीनवतळासुमठाणाधानोली,   5) नामांकित शाळा-नागभिडब्रम्हपुरीभद्रावती.

००००००

No comments:

Post a Comment