Search This Blog

Wednesday, 29 April 2026

ई-लिलावाद्वारे पोर्टलवर ट्रकची विक्री

 -लिलावाद्वारे पोर्टलवर ट्रकची विक्री 

Ø महाराज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 29 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळचंद्रपूर कार्यालय अंतर्गत एका ट्रक वाहनांचा 7 मे 2026 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ई – लिलाव करण्यात येणार आहेइच्छुकांनी यात सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहेट्रक क्रमांक एम.एच 15 डी .के. 5438 असून  खरेदी वर्ष जून 2013 आहेट्रकची अनामत रक्कम 25 हजार रुपये आहेसदर वाहनाची www.market.neml.in या पोर्टलवर विक्री करण्यात येत  आहे.

अटी /शर्ती  : सदर ई-लिलाव वाहने नियमानुसार आदिवासी भागातील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार अवजड परवानाधारक गरजू व होतकरु बांधवांना आयोजित करण्यात येत आहे.  लिलावामध्ये जे आदिवासी बांधव सहभागी होतीलअशा बांधवांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे अनिवार्य राहीलवाहने विक्री केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करूनच वाहने हस्तांतरित करण्यात येतील तसेच वाहन ज्या स्थितीत आहेत्या स्थितीत घ्यावे लागेलअंतिम बोली मंजूर वा  नामंजूर करण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रपूर यांनी राखून ठेवलेला आहेलिलावाशी संबंधीत सर्व बाबतीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचा अंतिम निर्णय बंधनकारक

सदर ई-लिलावातील इतर अटी - शर्ती  www.market.neml.in या Neml च्या पोर्टलवर उपलब्ध होतील. Neml वर संपर्कासाठी राजरतन बागडे (मो. 8421549842) संदेश वर्मा (मो. 9325440639) यांच्याशी संपर्क साधावाअसे प्रादेशिक व्यवस्थापक बीएसबरकमकर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment