मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती 30 एप्रिल पर्यंत भरण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 07 : सेवायोजन कार्यालये कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचा-यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
त्यानुषंगाने जानेवारी ते मार्च 2026 अखेर संपणाऱ्या तिमाहिची माहिती नमुना ई.आर.-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम ऑनलाईन पध्दतीने 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना कार्यालयाकडून यापूर्वीच युझर आयडी व पासवर्ड देण्यात आलेले आहेतच. त्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करून प्रत्येक आस्थापनांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.
तिमाही विवरणपत्र सादर करावयाची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे. हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. अशाप्रकारे ज्या आस्थापनेची नोंदणी नसल्यास त्यांनी वरील पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी किंवा नोंदणी असल्यास आस्थापनांनी तात्काळ माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी केले आहे.
यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास chandrapurrojgar@gmail.com यावर तसेच दूरध्वनी क्र. 07172- 252295 वर संपर्क करावा, असे सहायक आयुक्त अ.ला. तडवी यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment