योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी वेळेत बदल
चंद्रपूर, दि. 28 : जिल्ह्यात उन्हाची तिव्रता व वाढते तापमान पाहता प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरतर्फे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व अनुज्ञप्ती चाचणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण व चाचणी आता सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते 6 या वेळे दरम्यान घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 या दरम्यान नुतणीकरण व चाचणी बंद राहील.
तसेच ज्या पुर्वनियोजीत मुलाखती आहेत, त्या उपरोक्त वेळेत घेण्यात येईल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment