‘नीट’ परिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे
Ø जिल्हा प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यात ‘नीट’ (युजी) परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील 10 नियुक्त केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसंदर्भात उमेदवारांनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
1) रिपोटिंग आणि प्रवेश : परीक्षा केंद्रांवर प्रवेश सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल. अंतिम प्रवेशाची वेळ दुपारी 1.30 आहे. या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
2) अनिवार्य कागदपत्रे : उमेदवारांनी फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र, एक मूळ वैध फोटो ओळखपत्र सोबत आणावे
3) सुरक्षा आणि शिस्त : प्रवेशद्वारावर कडक तपासणी आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आणि शिस्त पाळणे अनिवार्य आहे. पालकांना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.
4) प्रतिबंधित वस्तू / ड्रेस कोड : उमेदवारांना खालील गोष्टी आणण्यास सक्त मनाई आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट वॉच, अभ्यास साहित्य, कागदपत्रे, कॅल्क्युलेटर, बॅग किंवा इतर कोणतीही अनधिकृत वस्तू. तसेच उमेदवारांनी दागिने, अलंकार, घड्याळे किंवा कोणतीही धातूची वस्तू घालू नये. बेल्ट, टोपी किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी नसलेले इतर साहित्य टाळावे. तपासणी सुलभ होण्यासाठी साधे आणि हलके कपडे परिधान करावेत. प्रतिबंधित वस्तू जवळ बाळगल्यास परीक्षेच्या नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल
5) सुविधा आणि व्यवस्था : सुरक्षा, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी आणि अखंड वीजपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
6) कडक उष्णतेबाबत महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी केंद्रावर येण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा. दीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशात राहणे टाळावे. उष्णतेमुळे होणारी घाई टाळण्यासाठी केंद्रावर लवकर पोहोचावे. ड्रेस कोडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हलके आणि आरामदायी कपडे घालावे. केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असेल; तथापि, उमेदवार मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली सोबत आणू शकतात.
7) महत्त्वाच्या सूचना : उमेदवारांनी प्रवेशपत्रावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.
8) पालकांसाठी सूचना : पालकांनी परीक्षा केंद्रांजवळ गर्दी करणे टाळावे. उमेदवार वेळेवर केंद्रावर पोहोचतील याची खात्री करावी. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. सर्व उमेदवार आणि पालकांनी या परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००
No comments:
Post a Comment