Search This Blog

Wednesday, 8 April 2026

खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी अलर्ट मोडवर काम करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

 





खते
 व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी अलर्ट मोडवर काम करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूरदि. 08 : शेतक-यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा असतो. यावर्षीच्या हंगामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी रासायनिक खते आणि बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. आजघडीला जिल्ह्यात   खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याला प्राधान्याने खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावे. परराज्यातील शेतक-यांना त्याची विक्री करू नये. तसेच खते आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने अलर्ट मोडवर काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खते आणि बियाणांची जिल्हाकरीता मागणीआवंटन आाणि उपलब्धता याबाबत आढावा घेतांना त्या बोलत होत्याबैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारउपसंचालक चंद्रकांत ठाकरेकृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपुतआत्माचे संचालक अरुण कुसळकरसर्व तालुका कृषी अधिकारी तसेच फर्टिलायझर्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा हा सिमावर्ती जिल्हा आहेअसे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्याखते आणि बियाणांचा काळाबाजार होणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे प्रकार निदर्शनास आल्यास त्यावर त्वरीत कारवाई कराजिल्ह्यात उपलब्ध खतांची आणि बियाणांची बाहेर राज्यात विक्री होणार नाहीयाबाबत नियमितपणे तपासणी करावीतसेच अनधिकृत बियाणे विकले जाणार नाहीयाबाबत सजग रहावेसिमेलगतच्या भागात कृषी आणि पोलिस विभागाने अलर्ट राहून काम करावे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याला त्याच्या मागणीनुसार खते आणि बियाणे उपलब्ध होतीलयाची काळजी घ्याबाहेर राज्यात त्याची विक्री होऊ देऊ नकाबियाणे उगवत नाहीअशा तक्रारी प्राप्त झाल्या तर कृषी विभागाने त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावेतसेच संपूर्ण कृषी यंत्रणेने गावस्तरावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावेअशा सुचनाही जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या.

अशी आहे जिल्ह्यातील खते आणि बियाणांची उपलब्धता आणि मागणी : चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 करीता एकूण खतांची मागणी 1 लक्ष 99 हजार 900 मेटन ची असून मंजूर आवंटन 1 लक्ष 80 हजार 800 मेटन आहेयापैकी आजघडीला जिल्ह्यात 93335 मेटन खतांची उपलब्धता आहेयात युरीया 23409 मेटनडीएपी 7502 मेटनएमओपी 825 मेटनसंयुक्त खते 35224 मेटन आणि एसएसपी 26375 मेटन आहेमंजूर आवंटन टप्प्याटप्याने जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तर जिल्ह्यासाठी एकूण 61619 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यात भात पिकाचे बियाणे 41796 क्विंटलज्वारी 270 क्विंटलतूर 1874 क्विंटलमूग 12 क्विंटलउडीद 13 क्विंटलसोयाबीन 13125 क्विंटलतीळ 10 क्विंटलकापूस  (बी.टी.) 4519 क्विंटलकापूस बी.टी (पॅकेट) 9 लक्ष 51 हजार 368 मागणी करण्यात आल्याचे कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपुत यांनी सांगितले.

०००००००

No comments:

Post a Comment