पालकमंत्री यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 23 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 1 मे 2026 रोजी चंद्रपुरच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्याचा 67 व्या स्थापना दिन समारंभानिमित्त 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी 10 वाजता नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक, सकाळी 11.20 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे पालकमंत्री प्रयाण करतील.
००००००

No comments:
Post a Comment