Search This Blog

Monday, 27 April 2026

प्रत्येक आदिवासी प्रकल्पात आता उन्हाळी प्रशिक्षण शिबीर - पालकमंत्री डॉ. वुईके



प्रत्येक आदिवासी प्रकल्पात आता उन्हाळी प्रशिक्षण शिबीर पालकमंत्री डॉवुईके

Ø चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या उपक्रमाची दखल व कौतुक

चंद्रपूरदि. 27 : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन होत असते. मात्र अशा शिबिरांची प्रवेश फी, अतिशय जास्त असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यांना पाठवू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणात खर्चही करू शकत नाहीही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहेहा अतिशय स्त्युत्य उपक्रम असूनपुढील शैक्षणिक वर्षापासून चंद्रपूरचा हा उपक्रम राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रकल्पात राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर अंतर्गत बोर्डा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होतेयावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमहानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेशप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारशाळेचे मुख्याध्यापक रामदास खवशी आदी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावाअसे सांगून डॉवुईके म्हणालेविद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीबद्दल माहिती व्हावीतसेच ही संस्कृती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेया संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी शासकीय आश्रमशाळा बोर्डा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबिरात धनुर्विद्यागोंडी व वारली पेंटिंगसंगीतविविध वाद्य वाजवणे कलाकराटेलाठी काठी चालवणेयोगाक्ले आर्ट व मुलींसाठी मेहंदी कलाबांबू आर्ट आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत्यामुळे या शिबिराचा आदिवासी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावाअसे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.अशोक वुईके त्यांनी केले.

शिबिरात चंद्रपूर प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व 24 अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य आश्रमशाळेतील सुमारे 150 मुली व 80 मुले अशा एकूण 230 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाकार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल पथकाच्या गजरात मंत्री डॉअशोक वुईके यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेयावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडाक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलेसदर उन्हाळी प्रशिक्षणामध्ये आलेल्या 230 विद्यार्थ्यांनाएक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात येत येणार आहेजेव्हा नवीन सत्रात शाळा सुरू होईलतेव्हा हे प्रशिक्षित झालेले विद्यार्थी आपापल्या शाळेमध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केलेसंचालन उच्च माध्यमिक शिक्षिका अनुराधा लाड यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास खवशी यांनी मानले.  कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारीसर्व मुख्याध्यापकशिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment