Search This Blog

Tuesday, 21 April 2026

महापालिकेने जागा द्यावी चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारणार – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके








 महापालिकेने जागा द्यावी चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारणार – पालकमंत्री डॉअशोक वुईके

Ø राजमाता राणी हिराई महोत्सव - 2026

चंद्रपूरदि. 21 : राजमाता राणी हिराई ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिकऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा आहेत्यांचा संघर्षपराक्रम आणि कर्तुत्वाची नवीन पिढीला ओळख व्हावीयासाठी दरवर्षी राणी हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात येईलएवढेच नाही तर चंद्रपूर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईलयासाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीअशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिली.

आदिवासी विकास विभागसांस्कृतिक कार्य विभागजिल्हा प्रशासन आणि महानगरपलिकेच्या वतीने चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव परिसरात आयोजित राजमाता राणी हिराई जन्मोत्सवात उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉवुईके बोलत होतेयावेळी महापौर संगिता खांडेकरखासदार प्रतिभा धानोरकरआमदार सर्वश्री किशोर जोरगेवारसुधीर मुनगंटीवारजिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेशप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारउपमहापौर प्रशांत दानवस्थायी समिती सभापती मनस्वी    गि-हेगोंडराजे केशव शहा महाराज आत्राम तसेच नगरसेवक आदी उपस्थित होते.

यावर्षीपासून प्रथमच राज्य शासनाच्या वतीने चंद्रपुरात राणी हिराई महोत्सवाला सुरवात झाली आहेअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेचंद्रपूर महानगरपालिकेने त्वरीत जागा दिली तर पुढील वर्षीच्या महोत्सवापूर्वी राणी हिराई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईलइतिहासात 23 गोंडराजे होऊन गेलेमात्र राणी हिराई ही एकमेव महिला राज्यकर्ती झालीया महोत्सवाच्या माध्यमातून राणी हिराईचा इतिहासत्यांचा त्याग आणि कार्याचे स्मरण लोकांसमोर येत आहेही अतिशय आनंदाची बाब आहेआदिवासी समाजाच्या पाठिशी गौरवशाली इतिहासअस्मिता आणि आदर्श संस्कृती आहेही संस्कृती कोणीही संपुष्टात आणू शकणार नाही.

आदिवासी समाजात 45 जाती आणि 181 उपजाती आहेतयावर्षी प्रथमच संपूर्ण समाजाला एकत्र आणण्यासाठी तसेच गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेचंद्रपूर जिल्ह्याचा पहिला आदिवासी पालकमंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. 2026 पासून सुरू झालेला राजमाता राणी हिराई जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईलअसेही पालकमंत्री डॉवुईके यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केलेमान्यवरांच्या हस्ते ‘राणी हिराई’ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आलेतसेच मान्यवरांनी विविध स्टॉलची पाहणी केलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनीसंचालन एश्वर्या भालेराव यांनी केलेयावेळी आदिवासी समाजातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

राणी हिराईचे स्मारक आणि संग्रहालय व्हावे : खासदार प्रतिभा धानोरकर

पतीच्या निधनानंतर कमी वयात आपल्या साम्राज्याची जबाबदारी राणी हिराई यांनी सक्षमपणे सांभाळलीराणी हिराईच्या कार्याचा वसाकर्तुत्वाचा उजाळा झाला पाहिजेया उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेआदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉवुईके यांनी हिराई महोत्सवाची सुरवात केलीया परिसरात राणी हिराईचे भव्यदिव्य स्मारक तसेच एक मोठे संग्रहालय व्हावेअशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

हिराई महोत्सवाला दरवर्षी निधी देणार : आमदार किशोर जोरगेवार

राणी हिराई यांनी 15 वर्षे राज्यकारभार सांभाळलाया काळात त्यांनी चंद्रपुरात महाकाली मंदीरमहादेव मंदीरएकविरा मंदीरपाण्यासाठी हौद बांधलेचंद्रपूरचा सांस्कृतिक वारसा जपावापर्यटनाला चालना मिळावीया उद्देशाने यावर्षी प्रथमच राणी हिराई महोत्सवाला सुरवात झाली आहेहा उत्सव दरवर्षी साजरा होणार असून त्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीमधून निधी देऊतसेच राणी हिराई महोत्सवासाठी जिल्हा नियोजन समितीमध्येसुध्दा निधीची तरतुद करावीअसे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

राणी हिराईचा जन्मोत्सव संकल्प करण्याचा दिवस : आमदार सुधीर मुनगंटीवार

 राणी हिराईचे कर्तुत्व एव्हरेस्टपेक्षा मोठे आहेराज्यकारभार करतांना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी एक एक वास्तु तयार केलीया जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून संकल्प करण्याचा दिवस आहेआदिवासी समाज हा प्रामाणिकशूरवीरपर्यावरणवादी आणि मेहनती आहेमिशन शौर्य अंतर्गत आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्टवर गेले,  असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

नियुक्तीपत्रे व लॅपटॉपचे वितरण : यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय नोकरीमध्ये नियुक्त झालेल्या प्रणय मडावीप्रशांत मडावीसुप्रिया कुमरे यांना नियुक्तीपत्रेउच्च शिक्षण घेणारे आदिती जुगनाकेसागर गेडाम यांना लॅपटॉपशबरी योजनेंतर्गत दिगांबर खंडवायेकिशोर आत्राम यांना लाभरविना परतेती यांना शिवणयंत्रासाठी अर्थसहाय्यवनिता पेंदोर यांना ताडपत्रीकरीता अर्थसहाय्यचित्रकला स्पर्धेत प्रथम आलेली राधिका आगरकरखुशाली गर्गेलवार (द्वितीय), शंकर भोयर (तृतीय), वकृत्व स्पर्धेत प्रांजल कोरांगे (प्रथम), प्रतिक्षा गेडाम (द्वितीय), क्रांतीवीर सिडाम (तृतीययांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment