Search This Blog

Tuesday, 7 April 2026

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा

 

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा

Ø एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना

Ø अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर


मुंबई / चंद्रपूर दि. 07 : राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या 25.36 लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात 73 हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेतसीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहेज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले आहे त्याठिकाणी ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहेज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाहीत्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून महाराष्ट्रात एलपीजीपेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती  अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत डिग्गीकर यांनी ही माहिती दिलीयावेळी शिधा नियंत्रक चंद्रकांत डांगेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मातेल उत्पादक राज्य समन्वयक उमेश कुलकर्णीभारत पेट्रोलियम कार्पोरेशनकृषी संचालक सुनिल बोरकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

पीएनजी व सीजीडी नेटवर्कला चालना : मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असलातरी राज्यातील पुरवठा सुरळीत असल्याचे सांगून अपर मुख्य सचिव डिग्गीकर म्हणाले,  जिथे शक्य आहे तिथे पीएनजीचा वापर वाढवण्यात येणार आहेज्या ठिकाणी पाईप लाईन गॅस पुरवठा शक्य आहेत्या ठिकाणी 30 जून पर्यंत पीएनजी बंधनकारक असून ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाहीत्या ठिकाणा एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे

राज्यात सुमारे 24 तेल डेपोमार्फत 8100 पेट्रोल पंपांना सेवा पुरवली जात असून दररोज सुमारे 18500 केएल पेट्रोल आणि 40000 केएल डिझेलचे वितरण केले जात आहे. 1 ते एप्रिलदरम्यानची विक्रीही मागील महिन्यांच्या सरासरीशी सुसंगत असल्याने इंधनटंचाईची स्थिती नाही.

एलपीजी पुरवठा नियंत्रणातडिजिटल बुकिंगला प्रोत्साहन : शिधा नियंत्रक श्री.डांगे यांनी सांगितले की,  राज्यातील 23 बॉटलिंग प्लांट्समार्फत सुमारे 2200 वितरक आणि 3.5 कोटी ग्राहकांना सेवा दिली जातेघरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज सरासरी 5.82 लाख रिफिल वितरित केले जात आहेतवितरण पारदर्शक करण्यासाठी डीएसी (Delivery Authentication Code) सक्तीचा करण्यात आला आहेग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारेच बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले असून सध्या 95 टक्के बुकिंग ऑनलाईन होत आहेतन्याय्य वितरणासाठी बुकिंग अंतराल निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा टप्प्याटप्प्याने : व्यावसायिक एलपीजीचे वाटप टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले आहेअत्यावश्यक सेवा क्षेत्रांना 100 टक्के पुरवठातर संरक्षणरेल्वेपोलीस यांसारख्या विभागांना 70 टक्के पुरवठा राखण्यात आला आहेउद्योग आणि इतर क्षेत्रांना 20 टक्के ते 50 टक्के पर्यंत पुरवठा दिला जात आहे.  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हॉटेलउपहारगृहेऔद्योगिक कॅन्टीनअन्न प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांना प्राधान्याने अतिरिक्त 20 टक्के वाटप करण्यात आले आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई : घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभर दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. 1 मार्च ते एप्रिल दरम्यान 14329 तपासण्या छापे अंतर्गत 3628  सिलिंडर जप्त करण्यात आले आहेतकारवाईदरम्यान 21 वाहतूक वाहने जप्त करण्यात आली असून गॅस कॅप्सूल/टँकर्सही ताब्यात घेण्यात आलेजप्त करण्यात आलेल्या एलपीजी गॅसचे एकूण प्रमाण 71565.14 किलो इतके आहेया प्रकरणांमध्ये 53 गुन्हे नोंदविण्यात आले असून 36 जणांना अटक करण्यात आली आहेया संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गॅस व वाहनांची एकूण अंदाजे किंमत कोटी 38 लाख 54 हजार 493 रुपये आहे.

नियंत्रण कक्ष व तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय : राज्यविभागजिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेतएलपीजी पुरवठ्यासंदर्भात तक्रारींसाठी 9769919221  हा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 17 मार्च ते एप्रिलदरम्यान 2409 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.

००००००

No comments:

Post a Comment