Search This Blog

Friday, 24 April 2026

पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दित मद्यविक्री बंद

 पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दित मद्यविक्री बंद

चंद्रपूरदि. 24 : चंद्रपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार 28 एप्रिल (मंगळवाररोजी मतदान व 29 एप्रिल (बुधवाररोजी मतमोजणी होणार आहेसदर मतदान व मतमोजणी दरमान्य कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टिकोनातून तेथील मद्य/बिअर विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे.

              चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीकरीता मतदानाचा अगोदरचा दिवस म्हणजे 27 एप्रिल रोजीमतदानाचा दिवस 28 एप्रिल रोजी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्य व बिअर विक्री अनुज्ञप्त्या दोन्ही दिवस बंद राहतीलतर 29 एप्रिल रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी आहे,  त्या स्थानिक प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व मद्य व बिअर विक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी निकाल लागेपर्यंत बंद राहतीलसदर आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतीलत्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईलयाची त्यांनी नोंद घ्यावीअसे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

No comments:

Post a Comment