जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त तपासणी शिबीर
चंद्रपूर, दि. 08 : जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जि. प. वरिष्ठ प्राथ. शाळा उदापूर व जि. प. प्राथ. शाळा काहली येथे तपासणी शिबीर घेण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष, दंत विभाग, ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालय, कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर व इंडियन सोसायटी ऑफ पेरीडोंटोलॉजी ॲन्ड इप्लांटोलॉजी विभागाच्या वतीने सदर शिबीर घेण्यात आले.
‘हॅपी माऊथ अ हॅपी लाईफ’ या घोषवाक्यसह दंत शल्य चिकित्सक तथा जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पिपरे यांच्या नेतृत्वात या शिबिरामध्ये उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथील दंत शल्य चिकित्सक डॉ. सविता काटेखाये, डॉ. साई कांचर्लावार, डॉ. लक्ष्मी फलके व डॉ. श्वेता बोरकर यांनी सदर शिबिरात एकूण 55 ( उदापूर - 23, काहली - 20, खंडाळा - 06, बोरगाव - 06 ) विद्यार्थांवर उपचार केले. या शिबिरात उदापूर शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुपट, काहली शाळेचे मुख्याध्यापक श्री. डोनोळे तसेच इतर शिक्षक व दंत तंत्रज्ञ सुरज राय, दंत सहाय्यक श्रीकांत चौथाले, हर्षद दहेलकर आदी उपस्थित होते.
०००००००

No comments:
Post a Comment