Search This Blog

Wednesday, 22 April 2026

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

 लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

Ø अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

चंद्रपूरदि. 22 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे.

सदर योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे स्थगिती देण्यात आलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार असूनत्यामधील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतऑनलाइन अपलोड करून करता येणार आहेयामुळे लाभार्थ्यांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

 

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण तपासणी स्तरावर दिसेलत्या ठिकाणी कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी महामंडळामार्फत पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणासाठी  पर्याय उपलब्ध होईललाभार्थ्यांनी सबमीट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीकरिता मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल व त्यावर महामंडळामार्फत नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल.

त्यानंतरच्या टप्प्यातलाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसहित दिसून येतीलअशा प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित त्रुटींची पूर्तता जिल्हा समन्वयकांमार्फत करावीसंबंधित लाभार्थ्यांनी होल्डची कारणे लक्षात घेऊन 15 दिवसांच्या कालावधीत अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून आपले प्रकरण नियमित करून घ्यावेमहामंडळ नियमानुसार योजना राबवित असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावीअसे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment