Search This Blog

Wednesday, 15 April 2026

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण मेळावा

 सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण मेळावा

चंद्रपूर, दि.15 :   सहायक आयुक्त, समाज कल्याण च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या पर्वावर सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांच्या मार्गदर्शनात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे तर प्रमुख अतिथी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा समुपदेशक धनंजय तावाडे, सहाय्यक लेखाधिकारी दिपक धात्रक, समाज कल्याण निरीक्षक मनोजकुमार माकोडे, पुनम आसेगावकर, श्वेता लक्कावार, उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावतुरे म्हणाल्या, अलिकडच्या काळात महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी तर्कसंगत विचार करण्याची शक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोण यांची वाढ न झाल्यामुळे महिला अजूनही बाबा बुवांच्या शोषनाच्या बळी पडत आहे. खऱ्याखुऱ्या सक्षमीकरणाकरीता महिलांमध्ये वैचारिक प्रगल्भता असणे, ही काळाची गरज आहे. समुपदेशक धनंजय तावाडे यांनी महिलांना सध्या भेडसावत असणाऱ्या उन्माद, फोबीया, मास हिस्टेरोया, क्रायसिस, ओसिडी, पॅरालाईस सिजोफेनिया याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य युवती व महिला उपस्थित होत्या.

००००००

No comments:

Post a Comment