Search This Blog

Thursday, 30 April 2026

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात




 

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात

Ø ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना करण्याची सोय

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूरदि. 30 : सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरवात होत आहे. देशातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असून 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहेचंद्रपूर जिल्ह्यात जनगणना शुभारंभाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेशनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामपालिका प्रशासन अधिकारी डॉविद्या गायकवाडतहसीलदार विजय पवारप्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदारसर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्याजनगणना हे राष्ट्रीय कार्य आहेविविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदारआमदारलोकप्रतिनिधीसभापती आदींची स्वयं गणना करावीतसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावेअधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावेजनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहेत्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

अशी राहील स्वयंगणनेची प्रक्रिया :

1) संकेतस्थळाचा वापर आणि लॉगिन : https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्याराज्य / केंद्रशासित प्रदेश निवडाकॅप्चा प्रविष्ट करा.

2) कुटुंब नोंदणी : कुटुंब प्रमुखाचे नाव. 10 अंकी मोबाईल क्रमांकमेल आयडी असल्यास प्रविष्ट कराकुटुंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाहीप्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरावाएकदा नोंदणी झाल्यावर तोच क्रमांक इतर कोणत्याही कुटुंबासाठी  वापरता येणार नाही.

3) भाषा आणि ओटीपी पडताळणी : पसंतीची भाषा निवडा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करानिवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही.

4) स्थानाचा तपशील द्या : जिल्हा निवडा आणि परिसर / गाव / नगर व पीन कोड प्रविष्ट करा.

5) नकाशावर आपले निवासस्थान शोधा : आपली अचूक निवासी इमारत ओळखण्यासाठी आणि स्थानाची पुष्टी करण्यासाठी नकाशावरील लाल मार्कर ड्रॅग करा.

6) प्रश्नावली पूर्ण करा : टूलटिप्सवारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूजआणि आवश्यक माहिती टिपांच्या मार्गदर्शनानुसार घरसुची आणि गृह गणना प्रश्नावली भरा.

7) पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन : प्रविष्ट केलेला सर्व डेटा तपासण्यासाठी पुर्वावलोकन स्क्रीनचा वापर करातुम्ही नोंदी संपादीत करू शकतानंतर सादर करण्यासाठी मसुदा जतन करू शकता किंवा अंतिमरित्या सादर करू शकता.

8) अंतिम सादर करणे : तुमचा डेटा लॉक करण्यासाठी ‘अंतिम सादर करा’ वर क्लिक कराअंतिम सादर केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीतसादर केल्यानंतर 11 अंकी एस.ई आयडी (एसएमएसआणि ईमेल दिले असल्यास त्यावर येईल.

9) गणकाची भेट : जेव्हा जनगणना गणक तुमच्या घरी भेट देईलतेव्हा तुमचा एस.आयडी त्यांना सांगाजर एस.आयडी विद्यमान नोंदीशी जुळला तर तपशील निश्चित करून सादर केले जातातअन्यथा गणक नव्याने डेटा गोळा करेल. 

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : नागरिकांनी दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल व केवळ जनगणना कार्यासाठीच वापरली जाईलत्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती भरावीतसेच 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment