Search This Blog

Monday, 27 April 2026

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

 ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई / चंद्रपूरदि. 27 : भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहेपारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आले आहेपरंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेतसदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता यावेया दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहेया प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षणदस्तऐवजीकरणसंवर्धनडिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्च 2026 पासून प्रारंभ करण्यात आला.

या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्थासंग्रहालयेग्रंथालयेधार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेतसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहेयामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्थाग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहेपरंतू कोणाला स्वखुशीने सदरील हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन ती स्विकारेल.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्थाविद्यापीठेसंशोधन संस्थाहस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहेमहाराष्ट्रात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. 1) कवी कालिदास संस्कृत विद्यापीठनागपूर क्लस्टर केंद्र, 2) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थापुणे क्लस्टर केंद्र, 3) आनंद आश्रम संस्थानपुणे स्वतंत्र केंद्र, 4) भारत इतिहास संशोधक मंडळपुणे स्वतंत्र केंद्र.

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगलेसंचालकपुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेततर अंजली ढमाळउपसंचालकमराठी भाषा विकास संस्थातथा अभिजात मराठी भाषा कक्षमराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

सदर सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत "Gyan Bharatam" हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकनपडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेया मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणेजिल्हास्तरीय समिती स्थापन करणेतसेच मंदिरेमठधार्मिक संस्थाविद्यापीठेग्रंथालयेशैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्थाग्रंथालयेसंग्रहालयेसंस्कृत पाठशाळाधार्मिक संस्थासंशोधकपारंपरिक पंडिततसेच एनसीसीएनएसएस स्वयंसेवकविद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहेया निमित्ताने आवाहन करण्यात येते कीआपल्याकडे जर काही हस्तलिखिते उपलब्ध असतील तर त्याची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल अॅप वर अपलोड करावी व या कार्यात सहभाग नोंदवावा.

०००००

No comments:

Post a Comment