Search This Blog

Tuesday, 21 April 2026

वन अकादमीतर्फे प्रशिक्षण कार्यक्रमांचे डिजिटायझेशन


वन अकादमीतर्फे प्रशिक्षण कार्यक्रमांचे डिजिटायझेशन

चंद्रपूरदि. 21 :  वन अकादमी येथे वन प्रशिक्षण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण व अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेप्रशिक्षण कार्यक्रमांचे डिजिटायझेशन करून विविध विषयांवरील व्याख्याने युट्यूब वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

वन प्रबोधिनीमध्ये परिविक्षाधीन वनक्षेत्रपाल तसेच महाराष्ट्र राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या प्रशिक्षणाकरिता पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय मान्यताप्राप्त अभ्यासक्रमानुसार विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहेसदर विषयांवरील व्याख्याने प्रबोधिनीतील अनुभवी प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील विषयतज्ज्ञ यांच्यामार्फत घेण्यात आली असून त्या सर्व व्याख्यानांचे उच्च दर्जाच्या पद्धतीने व्हिडिओ स्वरूपात रेकॉडिंग करण्यात आले आहे.

प्रशिक्षण व्यवस्थेला अधिक पारदर्शक सुलभ व परिणामकारक बनविण्याच्या उद्देशाने एल.एम.एस प्रणालीद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची सुविधा यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहेयामुळे प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये डिजिटल पद्धतीचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांना तसेच कार्यरत वन अधिकाऱ्यांना ज्ञानवृद्धीकौशल्यविकास व स्व-अभ्यासासाठी एक सक्षम डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहेसदर उपक्रम वन प्रबोधिनीचे संचालक आरएमरामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात येत असून भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे प्रशिक्षण व्यवस्थेत अधिक गुणवत्ता व परिणामकारकता आणण्याचा प्रबोधिनीचा प्रयत्न राहणार असल्याचे अपर संचालक उमेश वर्मा यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment