Search This Blog

Wednesday, 15 April 2026

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क


जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क

Ø लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई / चंद्रपूरदि. 15 : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनालसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहेजपानी मेंदूज्वर  आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहेसार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. 2015-16 दरम्यान देशातील इतर राज्यांत जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होतीयाच दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळलेमात्रमहाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली नव्हतीही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलीत्यांनी त्यावेळी केंद्र सरकाराला विशेष विनंती केली आणि जपानी मेंदूज्वर आजारांवरील लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात केलीया प्रयत्नांमुळे आज रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.

जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका : महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरण व नियंत्रण उपाययोजनांना गती देण्यात आली आहेहा आजार प्रामुख्याने डासांद्वारे पसरतो आणि मेंदूवर परिणाम करून गंभीर गुंतागुंतझटके तसेच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करतोया आजाराचा मृत्यूदर जास्त असून वाचलेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

राज्यातील सद्यस्थिती : राज्यात 2021 ते मार्च 2026 या कालावधीत रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकरणे आढळली आहेत. 2022 मध्ये रुग्ण, 2023 मध्ये रुग्ण, 2024 मध्ये रुग्ण व मृत्यू, 2025 मध्ये रुग्ण व मृत्यू नोंदविण्यात आलेतर 2026 च्या मार्चपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाहीनागपूरभंडाराचंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रुग्ण आढळले आहेत.

लसीकरण मोहिमेची प्रगती : एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान लसीकरण मोहिमेत राज्याने लक्षणीय प्रगती केली आहेपहिल्या डोसचे एकूण कव्हरेज 89.26 टक्के तर दुसऱ्या डोसचे 78.68 टक्के आहे.

         निदान व उपचार सुविधा : राज्यात जपानी मेंदूज्वराच्या निदानासाठी नागपूरगडचिरोलीसेवाग्राम (वर्धा), भंडारा आणि गोंदिया येथे पाच सेंटीनेल केंद्रे कार्यरत आहेततसेच 16 जिल्ह्यांमध्ये बाल अतिदक्षता विभाग (PICU) सुरू असून रुग्णांना आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

विदर्भ भाग सर्वाधिक संवेदनशील : आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भ हा जपानी मेंदूज्वरासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग आहेग्रामीण व कृषी क्षेत्रात डासांची वाढतसेच डुक्कर व पक्ष्यांच्या संपर्कामुळे संसर्गाचा धोका अधिक असतोकाही शहरी व उपनगरी भागातही साथीचा धोका संभवतो.

नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना : राज्यात नियमित लसीकरणविशेष मोहिमारक्त नमुना तपासणीडास नियंत्रणासाठी धूरफवारणीक्यूलेक्स डासांचे सर्वेक्षणजनजागृतीडासांच्या उत्पत्तीस्थळांवर गप्पी मासे सोडणे तसेच स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.

जनतेला आवाहन : जपानी मेंदूज्वर हा आजार विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावेडासांपासून संरक्षण करावे आणि ताप किंवा मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावाअसे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment