Search This Blog

Friday, 24 April 2026

उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराकरिता प्रवेश सुरू


 

उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराकरिता प्रवेश सुरू

चंद्रपूरदि. 24 : जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथील जलतरण तलावाचे विशेष बाब निधी अंतर्गत अद्यावतीकरण करण्यात आले असून राज्यराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयी सुविधायुक्त जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे.

लहान मुलांमध्ये जलतरण खेळाची आवड निर्माण व्हावीत्यांना खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे तसेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावेयाकरिता शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेदरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा लहान व मोठ्या जलतरण तलावामध्ये जलतरण उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाले आहे.

तसेच 20 एप्रिल  पासून प्रवेश देणे आहेइच्छुकांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहेअधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे संपर्क करावा.

००००००

No comments:

Post a Comment