Search This Blog

Friday, 10 April 2026

जिल्हाधिका-यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी








जिल्हाधिका-यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी

Ø रुग्णांशीही संवाद निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

चंद्रपूरदि. 10 : जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताच नुतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीचा तसेच प्रत्यक्ष भेटीचा सपाटा लावला आहेगुरुवारी गॅस एजन्सीला अकस्मिकपणे भेट दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. 10) जिल्हा सामान्य्‍ रुग्णालय आणि कर्मवीर मा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमहाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळेजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकरडॉनिवृत्ती जिवनेप्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.

रुग्णालयातील अंतर्गत तसेच बाह्य परिसरात नियमितपणे स्वच्छता ठेवावीअसे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्यारुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणीकॅटींगची उत्तम व्यवस्था असावीतसेच निर्माणाधीन असलेले सुलभ शौच्छालयाचे काम त्वरीत पूर्ण करून नागरिकांसाठी ते उपलब्ध करून द्यावेबाह्य रुग्ण विभागात रांगेत असलेल्या रुग्णांना बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था करावीजिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात विविध तपासणी कक्ष असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ झाला पाहिजेयेथील डॉक्टर्स आणि स्टाफ नवजात बालकांची चांगली काळजी घेतली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी उपस्थित रुग्णांशी संवाद साधून तुमच्या बाळाला काय झाले आहेवरचे जेवण करतो काअशी आस्थेने विचारपूस केलीतसेच सीटी स्कॅनसाठी दररोज किती रुग्ण येतातजेवणाची सुविधा कशी आहेबालरुग्ण कक्षात किती बेड आहेसर्पदंशाचे किती रुग्ण येतात आदींबाबत माहिती विचारलीयावेळी अधिष्ठाता डॉकांबळे यांनी सांगितले कीदररोज बाह्यरुग्णांची नोंदणी (ओपीडी) 1200 ते 1500 असतेतसेच भरती रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात.

विविध वॉर्डला भेट व पाहणी : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आपात्कालीन कक्षसोनोग्राफी व एक्स – रे कक्षअतिदक्षता विभागबालरुग्ण कक्षनवजात बालकांचे अतिदक्षता कक्षऑपरेशन थेटरपोषण व पुनर्वसन केंद्रजिल्हा शीघ्र अतिदक्षता कक्षातील मानसिक विकार तपासणी कक्षदृष्टीदोष तपासणी कक्षभौतिकोपचार विभागश्रवणदोष तपासणी कक्षज्ञानेंद्रिय एकात्मिक विकास कक्षदंत विभाग आणि नर्सिंग कॉलेजला भेट देऊन पाहणी केली.

निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट : जिल्हाधिकारी पंत यांनी बल्लारपूर मार्गावरील निर्माणाधीन मा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भेट दिलीया नवीन परिसरात कोणकोणते काम प्रलंबित आहे व कोणत्या यंत्रणा सदर काम करीत आहेयाबाबत माहिती जाणून घेतलीतसेच महाविद्यालयाच्या प्रलंबित कामांविषयी लवकरच एक आढावा बैठक घेण्यात येईलजेणेकरून नवीन परिसरात रुग्णालय स्थलांतरीत करणे सोयीचे होईलअसेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

०००००००

No comments:

Post a Comment