Search This Blog

Wednesday, 22 April 2026

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 22 : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना राबविण्यात येत असून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहेया योजनेच्या नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावीया योजनेअंतर्गत देशातील टॉप 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणार आहेतसेच चंद्रपूर जिल्हासाठी डिप्लोमा आणि डिग्री उमेदवाराकरीता अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या 20 जागा व श्रीराम जनरल इन्सुरंस कंपनी लिमीटेड या कंपनीच्या जागा उपलब्ध आहेत.

कॉपोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणेहा या योजनेचा मुख्य उद्देश आहेप्रत्येक इंटर्नसाठी प्रति महिना हजार रूपये देण्यात येणार आहे व इंटर्नशिप चा कालावधी किंवा महिने आहेभारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत या प्रशिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहेज्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष असून पूर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे

तरी चंद्रपूर जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment