महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 07 : डॉ. आंबेडकर फाऊंडेशन, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त (एप्रिल 2026 ते एप्रिल 2027) विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच शासनमान्य महाविद्यालये/ विद्यापीठे /संस्था यांना अनुदान देण्यात येणार आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र संस्थांना सदर योजनेची माहिती देऊन त्यांच्याकडून निर्धारित नमुन्यात सविस्तर प्रस्ताव प्राप्त करून घ्यावेत. प्रस्तावामध्ये कार्यक्रमाचे स्वरुप, खर्चाचा तपशिल व संस्थेचा अनुभव यांचा समावेश असावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार सामान्य शाखा येथे तात्काळ सादर करावेत, जेणेकरून पात्र प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी डॉ. आंबेडकर फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्याकडे सादर करता येतील, असे तहसीलदार प्रिया कवळे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment