Search This Blog

Wednesday, 15 April 2026

अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना लाभदायक

 

अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना लाभदायक

Ø डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

चंद्रपूरदि. 15 : अनुसुचित जातींमध्ये अलिकडच्या काळात उद्योगांविषयी जनजागृती होत असून नवउद्योजकांकरीता शासनाची मार्जिन मनी योजना अतिशय लाभदायक आहेअनुसुचित जातीतील उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा विकास करावाअसे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक श्रीखरमाटे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होतेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिक गोंडाणेबँक ऑफ महाराष्ट्राचे पंकज भैसारेबँक ऑफ इंडियाचे आरकेसिन्हासमाज कल्याणचे सहाय्यक लेखाधिकारी दिपक धात्रकबँक ऑफ महाराष्ट्राचे अक्षय सातकरइंडियन ओवरसिस बँकेचे कार्तिक खोब्रागडेसमाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी मार्जिन मनी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी मानलेकार्यक्रमाला बहुसंख्य नवउद्योजकांसह सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण कार्यालयाचे निरीक्षक मनोजकुमार माकोडेपुनम आसेगावकरश्वेता लक्कावारकनिष्ठ लिपीक संदिप वाढईगणेश खोटेसुरज डांगेराहुल आकुलवारसचिन राऊतअमोल गोहणेराहुल अंड्रसकरवैशाली ठाकरेउषा मुंढेउषा लोणकरआदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment