Search This Blog

Monday, 27 April 2026

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता


 

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता

Ø पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे निर्देश

चंद्रपूरदि. 27 : राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालककुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेतवाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे

उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत्त क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करावीयाबाबत पशुसंवर्धन विभागाने पशुधनाची  काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहेयामध्ये 1) पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. 2) आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. 3) दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा. 4) शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी 11 ते सायंकाळी या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावीत्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे. 5) गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. 6) उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्पफऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.

तातडीच्या उपाययोजना व उपचार : पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदाधापा टाकणेतोंडावाटे लाळ गळणेअस्वस्थता दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावेपशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावापशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याच्या सूचना दिल्या आहेतसर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे व औषधीसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहेफिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.

उष्णलहरीच्या काळात काय करावे : पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीतपिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठयाजवळ व सावलीत असावेतनसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावेचारावैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावाखाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावाउत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावागाभन पशुधनाच्या चाऱ्याची  काळजी घ्यावीआधुनिक गोठ्यामध्ये स्प्रिंकलर वापरावेतइतर पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पाणी फवारावेम्हशींना शक्य असल्यात स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावीसायंकाळच्या दूध दोहनाची वेळ टप्याटप्याने किमान तास उशिरा ठेवावी.

काय करू नये : पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नयेपाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नयेशेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नयेपशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नयेयाची दक्षता घ्यावी.  पशुधनाची गर्दी करू नयेदाटीवाटीने बांधु नयेभर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नयेउन्ह असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नयेमृत पशुधन उघड्यावर टाकू नये.

रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी/हौद ठेवावेतमृत पशुधनाची विल्हेवाट शास्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

०००००

No comments:

Post a Comment