Search This Blog

Tuesday, 31 October 2023

सर्वसामान्य नागरिक बल्लापूरच्या विकासाचे शिल्पकार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

 





सर्वसामान्य नागरिक बल्लापूरच्या विकासाचे शिल्पकार

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Ø नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

चंद्रपूरदि. 31 : लोकप्रतिनिधी म्हणून मला बल्लारपूर या स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करता आलीहे माझे सौभाग्य आहे. पण या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार येथील सर्वसामान्य नागरिक आहेतअशी भावना वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. बल्लारपूर तालुका विकासामध्ये असाच कायम अग्रेसर राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

बल्लारपूर येथे नगर परिषद प्रशासकीय बांधकामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. कांचन जगतापन.प. मुख्याधिकारी विशाल वाघकार्यकारी अभियंता मुकेश टांगले, हरीश शर्माचंदनसिंग चंदेलकिशोर पंदीलवारआशिष देवतळेकाशिनाथ सिंहमनिष पांडेसमीर केनेनिलेश खरबडेराजू दारी आदी उपस्थित होते.

बल्लारपूरचा कितीही विकास केला तरी येथील नागरिकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीअसे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेविकासाची अनेक कामे या क्षेत्रात झाली आहे. मात्र संपूर्ण शहराचे नियंत्रण ठेवणा-या  नगर परिषदेचीच इमारत राहून गेली होती. आज मात्र या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी करतांना अतिशय आनंद होत आहे.

बल्लारपूरमध्ये रविवारी 1.29 कोटी रुपयांच्या मिनी स्टेडीयमचे भूमिपूजन4 कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाची पायाभरणी आणि 10 कोटीच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. बाहेरून येणा-या व्यक्तीला या शहराचा हेवा वाटावाअसा विकास बल्लारपूरचा झाला आहे. नगर परिषदेच्या इमारतीकरीता जेवढा निधी लागेलतेवढा दिला जाईल. ही इमारत दर्जेदार आणि अप्रतिम व्हायला पाहिजेअशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी अंतर्गत नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या माळ्याचे काम करण्यात येणार असनू यासाठी 9 कोटी 78 लक्ष 71  हजार 792 निधीची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. कार्यक्रमाचे संचालन सतीश कनकम यांनी केले

बल्लारपूर विकासाचे मॉडेल : विसापूर येथील सैनिक स्कूलबॉटनिकल गार्डनएस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्रबल्लारपूर येथील पोलिस स्टेशनची इमारतआधुनिक जीमभाजी मार्केटनाट्यगृहअभिनव बसस्थानकविश्रामगृहशाळांच्या इमारतीमहिलांसाठी डीजीटल शाळाविशेष बाब म्हणून उपविभागीय कार्यालयनगर परिषद चौक ते कलारी काटा गेटखुल्या जागांचा विकासगणपती घाटछठ घाटांचा विकास आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणांवर तर चित्रपटांची शुटींगसुध्दा करता येतेत्यामुळे मुंबईतील दिग्दर्शकांना बल्लारपूर येथे आमंत्रित केल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

लोकशाहीचे मंदिर तसेच प्रभु रामाच्या मंदीरासाठी जिल्ह्याचे लाकूड : भारताच्या लोकशाहीचे मंदीर असलेल्या नवीन संसद भवनात तसेच अयोध्या येथील प्रभु रामाच्या मंदिरासाठी चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून लाकूड पाठविण्यात आले आहे. तसेच आता भारत – पाकिस्तानच्या सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची संधी राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून मला प्राप्त झाली आहे.

न.प. निवृत्त सफाई कर्मचा-यांचा सत्कार : नगर परिषदेच्या पायाभरणी समारंभात मुख्याधिकारी विशाल वाघ आणि माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सेवानिवृत्त सफाई कर्मचा-यांचा सत्कार आयोजित केलाही अतिशय अभिमानाची बाब आहे. या सफाई कर्मचा-यांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर सेवा दिलीत्यांच्या सेवेचा हा सन्मान आहेअसे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी चंद्रभान जोगीसुनील पवारसतिश गोगूलवारनरसुबाई नख्खाकमल मनसरामरामगोपाल मिश्राहंसाराणीअनिल लुथडेसुनील तुमरामगुणरत्न रामटेकेकानपल्ली मलय्यातुलसीराम पिंपळकरउमाकांत बंडावार आदी सफाई कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालश्रीफळ देऊन सत्कार केला.

००००००

‘मिनी स्टेडीयम’ चे काम दर्जेदार होण्यासाठी खेळाडूंनी लक्ष द्यावे - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार




 

मिनी स्टेडीयम’ चे काम दर्जेदार होण्यासाठी खेळाडूंनी लक्ष द्यावे - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरदि.31 :  जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेया खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवावा यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विसापूर येथील तालुका क्रीडा संकूल हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असून बल्लारपूर मध्येही मिनी स्टेडीयम’ चे काम हाती घेण्यात आले आहे. खेळाडूंसाठी होणाऱ्या या स्टेडियमच्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तमोत्तम व्हावा, यासाठी प्रशासनासोबतच खेळाडूंनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहेअसे विचार राज्याचे वनसांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

बल्लारपूर शहरातील मिनी स्टेडीयमच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. कांचन जगतापन.प. मुख्याधिकारी विशाल वाघजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेहरीष शर्माचंदनसिंग चंदेलकाशिनाथ सिंहसमीर केनेमनिष पांडेनीलेश खरबडेराजू दारी यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

शहरातील खुल्या जागेमध्ये मिनी स्टेडीयम करीता येथील खेळाडूंनी निवेदन दिले होतेअसे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेनाविन्यपूर्ण योजनेंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विकास व सौंदर्यीकरण अंतर्गत येथे संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच शौचालयॲप्रोच रोडमुख्य प्रवेश द्वारखडीकरण रस्तापाण्याची टाकी इतरही कामे येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 29 लक्ष 95 हजार 172 रुपये मंजूर करण्यात आले असून भविष्यात आणखी निधी देण्यात येईल. मात्र कामाच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर येथील खेळाडूंनीच लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सदर काम 3 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणालेबल्लारपूरमधील कुठलेही काम उत्कृष्टच असले पाहिजे. बसस्थानकपाणी पुरवठा योजनानाट्यगृहसैनिक स्कूलबॉटनिकल गार्डनपोलिस स्टेशन आदी विकास कामे दर्जेदार असून सिंगापूरचे कौन्सल जनरल यांनी चिठ्ठी लिहून या विकास कामांचे कौतुक केले आहे. आपले गावशहर नेहमी समोर राहावे. प्रत्येकच क्षेत्रात आपण अग्रेसर असलो पाहिजेयासाठी सर्वांनी मिळून विकासात योगदान द्यावे. आज एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील आयोजन करण्यात येईलअशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर विकासात अग्रेसर : बल्लारपूर शहरात तसेच तालुक्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. येथे न्यायालयाची इमारत प्रस्तावित असून 100 बेडेड रुग्णालय तसेच कामगार विमा योजनेअंतर्गत हॉस्पीटलची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

स्पोर्ट सेंटरसाठी प्रयत्न : देशात सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे उत्कृष्ट स्टेडीयम आहे. त्यामुळे या परिसरात स्पोर्ट सेंटर उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहे. सैनिक स्कूलमधील फुटबॉल ग्राऊंड आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असून युरोपियन संघाने या ग्राऊंडला मान्यता दिली आहे.

परिसरातील नागरिकांचा सत्कार : यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यात चंद्रशेखर घोडेराजू कंचर्लावारअनुप नगराळेदर्शन मोरेजगदीश फौजीअनिल मिश्राअजय शर्मासंकेत भालेरावकिशोर रणदिवेराहुल ठाकूरमुरली भाकरे आदींचा समावेश होता.

०००००००

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंनी घेतला मोफत जंगल सफारीचा आनंद



राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंनी घेतला मोफत जंगल सफारीचा आनंद

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या सुचना

चंद्रपूर, दि. 31 बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता आलेल्या खेळाडूंना ताडोबाची जंगल सफारी मोफत करण्याच्या सुचना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 225 खेळाडूंनी मोफत जंगल सफारीचा आनंद घेतला आहे. तर पुढील दोन दिवसात आणखी 300 खेळाडूंना ताडोबा सफारी करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे. 

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनपर भाषणातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वाघांच्या भुमीत खेळाडूंचे आगमन झाले आहे. त्यामुळे खेळाडूंनीही वाघासारखाच पराक्रम करावा. जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यापैकी 65 टक्के वाघ भारतात असून सर्वाधिक वाघ हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यभरातून बल्लारपूर येथे आलेल्या खेळाडूंना ताडोबाची मोफत जंगल सफारी दाखविण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.

त्यानुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने टप्प्याटप्प्याने खेळाडूंना मोफत ताडोबा दाखविण्याचे नियोजन केले आहे. ताडोबातील मोफत जंगल सफारीमुळे खेळाडूंनी आणि त्यांच्या पालकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

०००००

मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर कायदेविषयक जनजागृती सप्ताह

 

मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर कायदेविषयक जनजागृती सप्ताह

चंद्रपूर, दि. 31 : मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 व सायबर सेक्युरीटी या विषयावर शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस अधीक्षक कार्यालय, सायबर सेल, यांच्या संयुक्त विद्यमाने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या हेतूने शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना कायद्याविषयीची माहिती देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा-2012 या कायद्याबाबत विविध उदाहरणे देऊन माहिती दिली.  विद्यार्थ्यांनी चांगला स्पर्श, वाईट स्पर्श व सुरक्षित स्पर्शाबाबत जागरूक असले पाहिजे. काही अनुचित प्रकार घडत असल्यास शाळेतील मुख्याध्यापक आणि पालकांना सांगावे, असे आवाहन देखील श्री. जोशी यांनी मार्गदर्शनातून केले.

 सायबर सेप्टी सेलचे मुजावर अली यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कोणकोणत्या प्रकारचे असतात? त्यापासून आपण स्वतः व पालकांना कसे सुरक्षित ठेवावे, याबाबत माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या गुन्हेगारीपासून कसे परावृत्त व्हावे तसेच कोणत्याही आमिश व प्रलोभनाला बळी पडू नये, याबाबत माहिती दिली.

या शाळांमध्ये पार पडले जनजागृती कार्यक्रम :

इंदिरा गांधी गार्डन स्कुल, चंद्रपूर, वन अकादमी, शहिद हेमंत करकरे न्यू डॉन इंग्लिश स्कुल, मातोश्री विद्यालय, तुकूम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कुल मुरसाळा, महानगरपालिका प्रागंण, चंद्रपूर या याठिकाणी सप्ताह दरम्यान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

००००००

बिहार येथील हरवलेल्या बालकाला मिळाले पालक


बिहार येथील हरवलेल्या बालकाला मिळाले पालक

Ø महिला व बालविकास विभाग व चाईल्ड हेल्पलाईनची संयुक्त कार्यवाही

चंद्रपूर, दि. 31 : बिहार येथील हरवलेला बालक 25 ऑक्टोबर रोजी रेल्वे पोलीस दलास रेल्वे स्टेशन, चंद्रपूर येथे मिळाला. रेल्वे पोलीस दलाने बालकाबाबत चाईल्ड हेल्पलाईनला माहिती दिली. माहितीच्या आधारे महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात आली. सर्वप्रथम चाईल्ड हेल्पलाईन टीमने रेल्वे स्टेशन, चंद्रपूर येथे भेट देत बालकाची संपूर्ण माहिती घेतली. सदर बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला देण्यात आली. समितीचे आदेशान्वये आणि रेल्वे पोलीस दलाच्या समन्वयाने बालकाला शासकीय बालगृहात ठेवण्यात आले.

चाईल्ड हेल्पलाईन टीमने बालकाच्या पालकांशी संपर्क साधून 30 ऑक्टोबर रोजी बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले. समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी करून सदर बालकाला पालकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले आदींनी महत्वाची भुमिका पार पाडली.

०००००

हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

 

हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 31 : आकाश गंगाधर ठाकरे, वय 21 वर्ष हा मुलगा मौजा हडस्ती ता. बल्लारपूर येथे श्री. साई कंपनीमध्ये गावातील सिंमेट नालीचे काम करण्यास आला होता. सदर मुलगा 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वा. दरम्यान श्री. साई कंपनी हडस्ती येथून बेपत्ता आहे. गावात, नातेवाईक, मित्राकडे विचारपूस केली असता माहिती नसल्याचे आढळून आले. तसेच परीसरात व इतर ठिकाणी शोध शोध घेतला असता सदर मुलगा मिळून आला नाही.

हरवलेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे :

मुलाचे वय 21 वर्ष, रंग सावळा, उंची 5 फुट 3 इंच, सडपातळ बांधा, केस काळे उभे, डावा कान टोचलेला, अंगात निळया रंगाचा चेकचा शर्ट, सिंमेट रंगाचा नाईटपॅन्ट, पायात प्लास्टीकची काळया रंगाची चप्पल घातलेली आहे. तसेच मराठी व हिंदी भाषा बोलतो. सदर वर्णनाचा मुलगा परिसरात आढळून आल्यास त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन शहर पोलीस स्टेशन,चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

००००००

Monday, 30 October 2023

विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन

 






विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन

Ø बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Ø ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे तालुका स्तरावर प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा

चंद्रपूरदि. 30 : राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटविलेली मशाल केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर विजयाची मशाल स्वत:च्या मनात धगधगती ठेवून उत्कृष्ट कामगिरी करावीअसे आवाहन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडातहसीलदार डॉ. कांचन जगतापजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडवनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेलजिल्हा ॲथलॅटिक्स असोसिएशनचे सचिव सुरेश अडपेवारपरभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयंत टेंभरेक्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळेअरुणा गंधेपुनम नवघरेश्री. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील उदयोन्मुख खेळाडू वाघाच्या भुमीत आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारीजिल्हा क्रीडा अधिकारी आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात येईलअशी ग्वाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘मशालीची आग कायम धगधगती ठेवण्याचा संकल्प खेळाडूंनी करावा. प्रत्येक स्पर्धेत पराक्रम करून मी विजय मिळविणारचया उद्देशाने खेळाडूंनी वाटचाल करावी. राज्य शासन खंबीरपणे खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. वाघाच्या भूमित सर्व खेळाडू आले आहातपरत जाताना वाघासारखा पराक्रम आणि स्पर्धेचा आनंद सोबत घेऊन जा,’ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. तत्पूर्वीना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रतिमा पुजन आणि दीप प्रज्ज्वलनानंतर क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली.

जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रास्ताविक करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे स्पर्धा होत असल्याचे नमूद केले. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे प्रथमच तालुकास्तरावर राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्यातील सर्वांत उत्कृष्ट तालुका क्रीडा संकूल विसापूरमध्ये आहे. क्रीडा क्षेत्रावर केलेला खर्च हा सुवर्ण पदकांच्या स्वरुपात भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे,’ असे ते म्हणाले. 

ऑलिम्पिकचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवा

2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना जास्त पदके मिळवता आली नव्हती. मात्र अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. क्रीडा क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देत असून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने डोळ्यापुढे ऑलिम्पिकचे लक्ष्य ठेवावे,’ असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले.

क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास

राज्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तिन्ही ट्रॅक आपल्या जिल्ह्यात म्हणजे चंद्रपूर येथील क्रीडा संकुलातविसापूर क्रीडा संकूल आणि सैनिक स्कूलमध्ये आहेत. याशिवाय पोलिसांचे सर्वोत्तम जीम आपल्या जिल्ह्यात आहे. चंद्रपूरबल्लारपूरमूलपोंभुर्णा आदी ठिकाणी उत्तम स्टेडीयम उभारण्यात येत आहेतअसेही ते म्हणाले.

खेळाडूंना मोफत ताडोबा सफारी

जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यापैकी 65 टक्के वाघ भारतात असून सर्वाधिक वाघ हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यभरातून येथे आलेल्या खेळाडूंना ताडोबाची मोफत जंगल सफारी दाखविण्याचे नियोजन करावेअशा सुचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

उत्तम व्यवस्थेबाबत सूचना

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता चंद्रपूरमध्ये आलेले खेळाडूत्यांचे पालक व मार्गदर्शकांची राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था करावी. प्रत्येक खेळाडू येथून आनंद घेऊनच परत गेला पाहिजेअशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

दिमाखदार उद्घाटन सोहळा

विसापूर येथील क्रीडा संकूलात राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे अतिशय आकर्षक आणि मनमोहक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यात राज्याच्या संस्कृतीची झलक गोंधळ व देवीचा जागरमधून सादर करण्यात आली. तसेच लाठी-काठी मार्चव आतषबाजीने उपस्थितांची मने जिंकली. 

1600 खेळाडू व 700 पालकांचे आगमन

राज्यातील आठ महसूल विभाग तसेच पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी अशा एकूण 9 विभागांमधून 1600 खेळाडू आणि त्यांच्यासोबत 700 पालक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विसापूर येथे आले आहेत. तीन दिवस 1002004008001500 आणि 3000 मीटर धावणेगोळाफेकथाळीफेकउंच उडीलांब उडीहॅमर थ्रोभालाफेकक्रॉसकंट्री या स्पर्धा होणार आहेत.

00000

जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक व्यापक करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

 




जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक व्यापक करा  जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा आढावा

चंद्रपूर, दि.30 : शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात होऊ शकते. याकरीता शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाचे प्रतिबंध व दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. तसेच जिल्ह्यात संबंधित यंत्रणांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक व्यापक करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.,अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चत्तरकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. वाने, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, डाक निरीक्षक एस. दिवटे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे विजयकुमार नायर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, शिक्षण विभागामार्फत शाळा व महाविद्यालयांमध्ये मागील महिन्यात, चालू महिन्यात व यापुढे किती जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, याबाबत नियोजन ठेवावे. त्यासोबतच गोंडवाना विद्यापीठ तसेच विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयात अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे तसेच महाविद्यालयात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत कळवावे. एमआयडीसीने त्यांच्या क्षेत्रातील बंद पडलेल्या युनिटची माहिती घ्यावी. सदर युनिटची यादी तयार करून पोलिसांना द्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने एमआयडीसी क्षेत्रातील युनिटला पोलिसांच्या सहकार्याने भेटी द्याव्यात. तसेच जे कारखाने बंद आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

ते पुढे म्हणाले, कृषी तसेच वनविभागाने जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. डाक विभागाने डार्कनेट व कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. त्यासोबतच दैनंदिन पार्सलचे नियमित स्कॅनिंग करून तपासणी करावी. ड्रग्स मॅन्युफॅक्चर होऊ नये, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी. मेडिकल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सक्त निर्देश द्यावे, सीसीटीव्ही नसल्यास नियमानुसार कार्यवाही करावी.

आरोग्य विभागाकडे ड्रग्सबाबत कौन्सिल करण्यासाठी काउन्सलर नेमावे. तसेच वनविभागाच्या वनजमिनीवर गांजा व खसखसची लागवड होत असल्यास वनविभागाने याबाबतची माहिती द्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पोलिस विभागामार्फत अंमली पदार्थासदंर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.

००००००