Search This Blog

Tuesday, 31 December 2024

“विधी अधिकारी” पदाकरिता अर्ज आमंत्रित

 विधी अधिकारी पदाकरिता अर्ज आमंत्रित

Ø 10 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.31:महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वयेदि. 6 एप्रिल 2011 व समक्रमांकाचे निर्णय दि. 30 जुलै 2011 मधील तरतुदीनुसार 'विधी अधिकारीहे पद कंत्राटी पद्धतीने एकावेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे आहे. त्याकरितापात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक अहर्ता व अनुभव:

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवार महसूलसेवाविषयक तसेच प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी आदीबाबत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षमतेने पार पाडू शकेल. विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

सदर पदाकरिता एकत्रित मानधन रु. 30 हजार असून दुरध्वनी व प्रवास खर्च रु. 5 हजार असे एकत्रित मानधन रुपये 35 हजार प्रति महिना देय राहील. या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.

महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसारविधी अधिकारी यांची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारित राहील. विधी अधिकारी हे पद नियमित स्वरूपात 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येईल. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी तसेच कोणताही गुन्हा नोंद नसावा. विधी अधिकारी यांचे काम असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यांचे विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची तात्पुरत्या स्वरूपातील नेमणूक रद्द करण्यात येईल. तसेच विधी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर इतर खाजगी कामे करता येणार नाही.

पदभरतीबाबत कार्यक्रम :

सदर पदाकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध केलेल्या यादीमधील चुकीबाबत उमेदवारांनी कार्यालयामध्ये समक्ष लेखी अर्ज करण्याची 16 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख असेल. तर झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 17 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांची प्राविण्य पडताळणीसाठी लेखी चाचणीप्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना दि. 20 जानेवारी 2025 रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रेप्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीअर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर जाहिरात व विहित नमुन्यातील अर्जलहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कार्यालयाच्या https://chandrapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर या पत्त्यावर दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचास्थगितरद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समितीचंद्रपूर यांना राहील.

000000

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीचा आढावा



 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीचा आढावा

चंद्रपूरदि.31:  जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शनजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळेस्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावरअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण उमपउत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिकशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेजिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाहीयाची दक्षता अन्न व औषध प्रशासन विभागाने घेऊनवेळोवेळी बंद व सुरू असलेल्या कारखान्यांना भेट द्यावी. मेडिकल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत कायाबाबत तपासणी करावी. कृषी तसेच वनविभागाने खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

 खाजगी कुरियरटपाल तसेच बसेसमध्ये येणाऱ्या पार्सलमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्यास तपासणी करावीयाबाबत पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. पोलीस विभागाला अंमली पदार्थ आढळून आल्यास तो पदार्थ अंमली आहे किंवा कसे याबाबत नार्कोटिक्स डिटेक्शन किटद्वारे प्राथमिक चाचणी करून घ्यावी. गावातील सरपंच व पोलीस पाटलांना शेतकऱ्यांमार्फत अंमली पदार्थांची लागवड होत आहे का याबाबत तपासणी करण्याच्या सूचना द्याव्यात. असे निर्देश संबधित यंत्रणाना बैठकीत दिले.

०००००००

रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा




 

रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा

चंद्रपूर,दि.31: कोणताही अपघात हा त्या व्यक्तीवर व त्याच्या कुटुंबावर होणारा फार मोठा आघात असून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून वाहन चालविणे आवश्यक आहे.  हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून रस्ते अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. हे अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणाना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शनमनपा आयुक्त विपिन पालीवालसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेनगरप्रशासन अधिकारी विद्या गायकवाडविभाग नियंत्रक स्मिता सुतावणेसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेजिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅकस्पॉट) माहिती घ्यावी. जिल्ह्यातील नवीन ब्लॅकस्पॉटला पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्तपणे भेटी द्याव्यात. रस्त्यावर असणाऱ्या अपघातप्रवण स्थळांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करुन सदर ब्लॅकस्पॉट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. अपघात प्रवणस्थळ तसेच वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे की नाही याबाबत पोलीसपरिवहन आणि बांधकाम विभागाने संयुक्तपणे भेट देवून तपासणी करावी.

नॅशनल हायवे विभागाने रस्ता खराब झाल्यास तातडीने दुरुस्ती करावी. स्पीड कंट्रोलसाठी ऑटोमॅटिक चालान जनरेटर लावण्यात यावे. जेणेकरूनवेगावर मर्यादा येईल व चालकांना शिस्त लागेल. रोडवरील वाहतूक अतिक्रमणासाठी पोलीसपरिवहन विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी. महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा जनावरांचा बंदोबस्त करावा. तालुकास्तरावर विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागपोलीस विभाग व परिवहन विभागाने समन्वयातून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या रस्ते अपघाताची माहिती जाणून घेतली.  रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहेत्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. विशेषत: शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला-मुलींमध्ये प्रामुख्याने जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देखील दिल्या.

0000000

नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा - जिल्हाधिकारी विनय गौडा


नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा

- जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूरदि.31: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यापासूनच पतंगबाजी सुरू झाली आहे. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे पशू-पक्षींना इजामानवहानी तसेच मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या जीवितहानीकडे सर्रास दुर्लक्ष करत नागरिक मांजाचा वापर करतात. त्यामुळे येणारे सण बघता मांजाच्या प्रतिबंधाबाबत टीम तयार करा. जिल्ह्यामध्ये मांजाची विक्रीवापर व साठवणूक करणाऱ्यांवर नियमानुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात नायलॉन मांजाच्या प्रतिबंधाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवालनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारप्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) निशिकांत रामटेकेजिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारेपोलीस निरीक्षक लता वाडिवे आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेनायलॉन मांजाच्या प्रतिबंधासंदर्भात कोर्टाने कारवाई करण्याचे निर्देश पूर्वीपासूनच दिलेले आहे. पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मांजा विक्रेतेसाठा वितरण करणाऱ्या दुकानदारांवर धाडसत्र मोहीम राबवून साठा जप्त करावा. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने टीम नेमावी. सदर टिमने दुकान व बाजारात जाऊन मांजा विक्री होत असल्याबाबत तपासणी करावी. त्यासोबतचनायलॉन मांजाच्या दुष्परिणामाबाबत माहिती देवून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी. असे निर्देश देखील जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत दिले.

000000000

Monday, 30 December 2024

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

         अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Ø  31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.30:अल्पसख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती जागा निवडीसाठी सन 2024-25 करीता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडिलाकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्या प्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) 200 च्या आत असावी.

लाभाचे स्वरुप:

परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गांनी इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास आदी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केले जाईल.

विद्यार्थ्यांने वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट, समक्ष किंवा पोस्टाने समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा. तसेच https://fs-maharashtra.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरावी. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.

 

तरी,अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले आहे.

०००००००

2 ते 4 जानेवारी दरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

 2 ते 4 जानेवारी दरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

 

Ø विद्यार्थ्यांच्या मैदानीइनडोअर आणि सांस्कृतिक स्पर्धां रंगणार

चंद्रपूरदि. 30: जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहात राहणाऱ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा तसेच या मुलांना कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांशी स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावासांस्कृतिक व मैदानी खेळामध्ये कला व कौशल्य दाखवण्याची संधी मिळावीयाकरिता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन दि. 2 ते 4 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात येत आहे.

2 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शनमहानगरपालिका आयुक्त विपिन पालिवालबाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी सीमा लाडसेमहिला व बालविकास नागपूर विभाग नागपूरच्या विभागीय आयुक्त अपर्णा कोल्हेजिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबेबालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर आदींची उपस्थिती असणार आहे. तर 4 जानेवारी 2025 रोजी सदर स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

मैदानीइनडोअर आणि सांस्कृतिक स्पर्धां रंगणार:

2 ते 4 जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या मैदानीइनडोअर तथा सांस्कृतिक स्पर्धां पार पडणार असून जिल्ह्यातील सर्व मुलांचे-मुलींचे बालगृह आणि जिल्ह्यातील बारा शाळांमधील 1 हजार विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धा रंगणार आहे. खोखोकबड्डीधावणेबुद्धिबळकॅरमवक्तृत्वनिबंधचित्रकलावादविवादरांगोळीनृत्यगायननक्कल आणि एकांकिका आदी स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

00000

Thursday, 26 December 2024

27 डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप कार्यक्रम

 

27 डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत

लाभार्थ्यांना सनद वाटप कार्यक्रम

Ø जिल्ह्यातील 82 गावांत विशेष शिबिराचे आयोजन

        चंद्रपूर दि. 26 : गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे हक्क आणि प्रापर्टी कार्ड देण्यासाठी मालकी हक्काची महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना सनद वाटप योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे 27 डिसेंबर 2024 रोजी होणार आहेस्वामित्व योजने अंतर्गत देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. 

            शासनाकडून जिल्हास्तरावर तसेच गावात सनद कॅम्प घेण्याचे निर्देश प्राप्त आहेतत्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सदर योजनेमधील 50 लाभार्थ्यांना प्रातनिधीक स्वरुपात खासदारआमदार यांच्या हस्ते सनद वाटपाचा कार्यक्रम सकाळी  11 वाजता नियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालय परिसरचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात संबंधित लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील 82 गावांत कॅम्प आयोजित करण्यात आले असून तिथे शासकीय अधिकारीकर्मचारी यांच्या माध्यमातून सनद वाटप होणार आहे.

तरी सदर योजनेचा लाभ घेऊन आपल्या मालकी हक्काचे जतन करणारी सनद प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख भूषण मोहिते यांनी केले आहे.

स्वामित्व योजनेचे फायदे  : 1. अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमापनकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे. 2. सीमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील. 3. मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी, 4. कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, 5. जमिनीशी संबंधीत मतभेदाचे त्वरित निराकरण, 6. मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ आणि 7. गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना

००००००

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित

 

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये

इयत्ता 1 ली प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित

Ø 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.26: सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील  इंग्रजी  माध्यमाच्या  नामांकित  निवासी  शाळेत इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्याकरीता अनुसूचित जमातीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरीता 23 डिसेंबरपासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज विहित कागदपत्रासह 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्विकारले जातील.

अर्जासोबत विद्यार्थ्यांचा जन्म तारखेचा दाखलाआधार कार्ड जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय  नोकरदार नसावेत. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र तसेच विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक विधवाघटस्फोटितनिराधारपरितक्या असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडावा. इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित निवासी शाळेमध्ये करण्यात येणार नाही. कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची वेळ आल्यास एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलइंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच करण्यात येईल.

  वरीलप्रमाणे प्रवेशाबाबतचे दाखले अर्जासोबत जोडून 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणताही विचार करण्यात येणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे निवड प्रक्रियेचा पूर्ण अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समितीस राहील. शासनस्तरावर निवड झालेल्या शाळेत व मंजूर प्रवेश संख्येच्या अधिन राहून विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईल. मंजूर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईल.

इयत्ता 1 लीत प्रवेश घेण्याकरीता अटी व शर्ती : 1. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2. विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी व प्रमाणपत्राची मुळप्रत तपासणीसाठी सोबत आणावी. 3. जर विद्यार्थ्याचे पालक दारिद्र्य रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी.एल. प्रमाणपत्र जोडावे. 4. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लक्ष रु. इतकी असावी. 5. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दि. 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 6. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासननिर्णय/परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली करीता विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरण्यात येईल.

या ठिकाणी आहेत प्रवेश अर्ज निशुल्क उपलब्ध : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयजिल्हा स्टेडीयम मागेसिव्हील लाईनचंद्रपूर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळाशासकीय वस्तीगृहएकलव्य रेसिडेंशियल स्कुलदेवाडा या ठिकाणी प्रवेश अर्ज नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करून अचुक व परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर

 

ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करून

अचुक व परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर

Ø नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाकडी फर्निचर आणि साहित्य खरेदी

चंद्रपूर दि. 26 : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ बायपास मार्गावर जवळपास 50 एकर जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे  बांधकाम करण्यात आले आहे. या नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी 57 कोटी तर मेडिकल साहित्यासाठी 41 कोटी 76 लाख रुपयांची आवश्यकता आहे. कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी साहित्य खरेदीसाठी निधी मागणीबाबतचा प्रस्ताव सहा महिन्यापुर्वीच राज्य शासनाकडे सादर केला आहे.

या रुग्णालय व महाविद्यालयाकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीचा अभ्यासपूर्वक प्रस्ताव विहित नमुन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदरुग्णालयातील आवश्यक यंत्रसामुग्रीसध्या रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेली यंत्रसामग्री आणि यापैकी ज्या यंत्रसामुग्री संस्थेत मानकाप्रमाणे आवश्यक आहे परंतूती यंत्रसामुग्री उपलब्ध नाहीअशा यंत्रसामुग्रीचा रु. 42 कोटी 71 लक्ष 79 हजार 800 रकमेचा प्रस्ताव संचालनालयवैद्यकीय शिक्षण व संशोधनमुंबई यांना सादर करण्यात आला होता.

मात्रसदर प्रस्तावात ई-उपकरण प्रणाली किमतींमध्ये तफावत आल्याने त्रुटी पूर्ण करण्याबाबत तसेच प्रस्तावाची संपूर्ण छाननी करून अचूक व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. अनुषंगानेसंस्थेमार्फत दि. 19 मार्च 2024 च्या प्रस्तावातील ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करून रु. 41 कोटी 76 लक्ष 61 हजार 800 एवढ्या रकमेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

ई-उपकरण प्रणालीमध्ये दर्शविलेल्या यंत्रसामुग्रीच्या किंमतीबाबत संस्थेतील विभागांना किंमती मान्य आहे. तसेच यंत्रसामुग्री खरेदीसाठीचा प्रस्ताव रु.41 कोटी 76 लक्ष 61 हजार 800 रकमेचाच असल्यामुळे शेवटी हीच किंमत ग्राह्य धरून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देणेबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी शासनाला कळविले आहे.

००००००

चिमूर तालुक्यातील शेतक-यांसाठी 28 डिसेंबर रोजी लायसन्स कॅम्पचे आयोजन

 

चिमूर तालुक्यातील शेतक-यांसाठी

28 डिसेंबर रोजी लायसन्स कॅम्पचे आयोजन

चंद्रपूर दि. 26 : जिल्ह्यातील वाहनांची तपासणी करतांना बहुतेक शेतक-यांकडे लायसन्स नसल्याचे निदर्शनास येत आहे. शेतमालाची वाहतुक करण्याकरीता ट्रॅक्टरटॉलीचा तसेच इतर शेतीच्या कामासाठी दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येतो. तथापिदुर्देवाने अपघात झाल्यास शेतकऱ्यांकडे लायसन्स नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. याकरीताचिमूर तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी शिकाऊ लायसन्सकरीता 28 डिसेंबर 2024 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिराकरीता दि. 27 डिसेंबरपासून ऑनलाईन अपॉईंटमेंट खुले करण्यात येतील. कोणत्याही मध्यस्थ व एजंटमार्फत न येता सी.एस.सी. केंद्रामधून विहीत शासकीय शुल्क भरणा करुनच अर्ज सादर करावा. अर्ज करतेवेळी काही अडचण आल्यास सहायक मोटार वाहन निरीक्षक कमलेश खाडे यांचेशी 9657059899 या भ्रमणध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. तसेच या  शिबिराचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

००००००

Tuesday, 24 December 2024

बालगृह, दत्तक संस्थेतील बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घ्या - जिल्हाधिकारी विनय गौडा




 

बालगृहदत्तक संस्थेतील बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घ्या - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हा महिला व बालविकास विभागाची त्रैमासिक आढावा बैठक

चंद्रपूरदि. 24 : काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बालगृहनिरीक्षण गृहविशेष दत्तक संस्था आदी निवासी संस्था चालविण्यात येतात. या संस्थेत वास्तव्यास असणाऱ्या बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घ्यावी. याकरिता आरोग्य विभागाशी समन्वय ठेवून संस्थांना नियमित भेटी द्याव्यातअसे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा बाल संरक्षण कक्षचाइल्ड हेल्पलाइनबालकल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होतीयावेळी ते बोलत होते.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवारजिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईतजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेरोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमेजिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवेबालकल्याण समितीच्या अध्यक्ष क्षमा बारसकरजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरजिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) पुनम गेडाम आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेबालकांच्या आरोग्याशी संबधीत विशेष काळजी घ्यावी. बालकांचे पालन पोषणावर विशेष भर द्यावा. आरोग्य बिघडल्यास शासकीय रुग्णालयात दाखल करावे. तसेच संस्थात्मक अधिकाऱ्यांकडून प्रत्येक बालगृहाला नियमित भेटी द्याव्यात अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन वात्सल्य पोर्टलजिल्ह्यातील थांबविण्यात आलेले बालविवाहजिल्हास्तरावरील बालगृहेअनाथ प्रमाणपत्र बाबत तसेच प्रतिपालकत्व बाबत माहितीदत्तक प्रक्रियाजिल्ह्यातील बालकांच्या गुन्ह्याबाबतची प्रकरणे आदींची माहिती जाणून घेतली.

००००००

मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

 मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 24: महाकाली मंदीर परिसरात एक अनोळखी वयोवृद्ध महिला झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर महिलेस सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे उपचाराकरीता भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. सदर महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नसल्याने  मृत  महिलेची ओळख  पटविण्याचे  आवाहन  चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय अंदाजे 70 वर्षउंची 5 फुटरंग काळा-सावळागोल चेहरानाक सरळकेस काळे पांढरे गुंतलेलेउजव्या हातावर शांताबाई नाव गोदलेले,  अगांत निळ्या रंगाचा स्वेटर ज्यावर पाढंऱ्या रंगाचे पट्यांची डिझाईन असलेले व त्या खाली कथ्या रंगाचा गावून त्यावर पाढंऱ्या हिरव्या रंगाचे डिझाईन असलेले परीधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर  मृतक अनोळखी  महिलेला कोणी ओळखत असल्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे  तपासी अमंलदार 9923401065 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

00000

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

 अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 24: अनोळखी पुरुषाची सामान्य रुग्णालयचंद्रपूरच्या बाहेरील आवारात तब्येत खराब झाल्याने त्यास सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात भरती करण्यात आले. तसेच पुढील उपचाराकरीता वार्ड क्र.8 मध्ये भरती केले असतावैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारादरम्यान मृत घोषीत केले. सदर इसमाच्या एम.एल.सी.वरील मौजा किटाळी येथील नमुद पत्त्यावर शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नसल्याने  मृत  इसमाची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय अंदाजे 60 वर्षउंची 5 फुटरंग काळा-सावळासडपातळ बांधाकेस पांढरेदाढी मिशी वाढलेलीअंगात पाढंरे काळपट रेषाचापाढऱ्या रंगाचा फुल शर्टव कमरेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा बरमुडा परीधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर  मृतक अनोळखी  व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके 9767103829व पोलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे 9511834754 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

000000