Search This Blog

Thursday, 31 July 2025

1 ते 7 ऑगस्ट पर्यंत साजरा होणार महसूल सप्ताह


ते ऑगस्ट पर्यंत साजरा होणार महसूल सप्ताह

चंद्रपूरदि. 31 : जिल्हास्तरीय महसुली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणेमोजणी करणेअपील प्रकरणांची चौकशी करणेमहसूल गोळा करणे तसेच संबंधित कामे उत्कृष्ट पध्दतीने करणा-या व महसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावीशासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावायासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ते ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेतया अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

असे राहील महसूल सप्ताहाचे स्वरुप : 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईलमहसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी -कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ.

2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप कार्यक्रम.

3 ऑगस्ट रोजी पाणंद/ शिवरस्त्यांची मोजणी करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे.

4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे.

5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून अनुदानाचे वाटप करणे.

ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काषित करणे.

7 ऑगस्ट रोजी एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे यांनी केले आहे.

००००००

फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये संपर्क करण्याचे आवाहन


फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये संपर्क करण्याचे आवाहन

Ø शिवलक्ष्मी महिला नागरी सहपत निधी लिमिटेड प्रकरण

चंद्रपूरदि. 31 : विविध योजना तसेच अधिक पैशाचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवूनशिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमीटेड शेगाव (बु.) या पतसंस्थेमध्ये  फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखापोलिस अधिक्षक कार्यालयचंद्रपूर येथे संपर्क करावाअसे आावाहन पोलिस विभागाने केले आहे.

वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील रहिवासी अब्दुल रहेमान शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमिटेडचे संचालक मनोज खोंडेसुभाष चाफले, श्रीकांत घाटे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये शेगाव बु. यथे पत निधीची स्थापना केली. स्थानिक लोकांना एजंटव्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करून स्थानिक लोकांना गुंतवणुकीचे प्रलोभन दिलेविविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास खूप फायदा होईल, याकरीता वाढीव व्याजदरदाम दुप्पट परतावा, तात्काळ लोन सुविधा, लखपती बनण्याच्या योजनापिकनीक कर्जतारण कर्ज, बचत गटांना कर्ज अशा विविध योजनांबाबत आमिष दाखविले.

स्थानिक गुंतवणुकदारांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचे संचालक आरोपी मनोज खोडेसुभाष चाफलेश्रीकांत घाटे व इतर आरोपींनी एकूण 1 कोटी लक्ष 73 हजार 578  रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पोलिस स्टेशन शेगाव बुयेथे भारतीय न्यास संहिता 318(4), 316 (2), 316(5), 3(5) सहकलम एमपीआयडी अॅक्ट 1999 अन्वये गुन्हा नोंद असून तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

या प्रकरणी ज्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाली आहे, अशा गुंतवणूकदाराच्या रक्कमेच्या याद्या तयार करणे सुरू आहेतसेच ज्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारानी गुंतवणुकीचे कागदपत्र (गुंतवणूकिचे प्रमाणपत्ररक्कम जमा पावत्याआधार कार्डपॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याच्याा पासबुकची झेरॉक्स प्रतमाहितीसह महाराष्ट्र शासन परीपत्रक क्रमांक एम पी आय /प्र.क्र. 09/पोल-11 दिनांक 25/02/2019 अन्वये गुंतवणूकदाराचे परीशिष्ठ- 1 प्रमाणे फार्म भरून देण्याकरीताा आर्थिक गुन्हे शाखा, (पोलिस ठाणे दुर्गापुर परिसरपोलिस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे सहापोलिस निरीक्षक पंकज बेसाणे (मो. नं.7588518549) यांच्याशी संपर्क करावाअसे पोलिस विभागाने कळविले आहे.

००००००

Wednesday, 30 July 2025

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू - मंत्री मंगल प्रभात लोढा

 

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू - मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईदि. ३० : केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७०  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर  येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहेअसे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक)ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम  शिकविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यार राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेवून या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमाची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक  यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि  मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील त्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईलअसेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी  अनसूचित जातीतील व नवबौध्द घटकातील प्रशिक्षणार्थ्यींचे सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीसाठी चेंबूर  येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात दिली आहे.  या संस्थेत सन २०२५-२६ साठी रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशीयनइलेक्ट्रिशियनवायरमनआय. ओ. टी. टेक्निशियन (स्मार्ट सिटी)इलेक्ट्रीक मेकॅनिक हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

मंत्री श्री.लोढा म्हणाले कीशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देवून जास्तीत जास्त  कुशल मनुष्यबळ तयार करणे  हा कौशल्य विकास विभागाचा उद्देश आहे. आय.टी.आय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातील ३६ जिल्हास्तरीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जावाढ करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनाच्या सहायाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वृध्दींगत करणेराज्यात दरवर्षी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेराष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. आय.टी.आय मध्ये नविन कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग जगताला आवश्यक असे अधिक मागणीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तंत्रप्रदर्शन व युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबीरांच्या माध्यमातून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगाराच्या संधी अधिकाधिक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहेअसेही  मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

००००००

जिल्हाधिका-यांकडून इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी


 

जिल्हाधिका-यांकडून इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी

चंद्रपूरदि. 30 : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली.  तसेच इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुध्दा वाढ झाली असून  इरई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर शहरातील नदीलगत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसतो. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेतहसीलदार विजय पवारजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी केली.

चंद्रपूर जिल्ह्याला 24 जुलै रोजी ऑरेंज आणि 25 व 26 जुलै रोजी रेड अलर्ट होतात्याअनुषंगाने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.  यावेळी इरई धरणाच्य पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. सध्या पाणी पातळी ही 206.35 मीटर एवढी आहेजुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही पाणी पातळी 206.08 मीटर एवढी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असतेधरणाची पाणी पातळी ही एस..पीनुसार मेंटन ठेवावी तसेच एक तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा, जेणेकरून त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा धरणाच्या पातळीतील नोंदी अचूक असाव्यातकोणत्याही निष्काळजीपणाचा फटका नदीकाठावरील वस्त्यांना होऊ नयेअशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉव्यवहारे यांनी दिल्या.

त्या अनुषंगाने 28 जुलै पासून धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटर ने उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहेआवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल किंवा पाण्याचा विसर्ग थांबण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापन अधिकारी श्री. राजूरकर यांनी दिलीयावेळी जलसंपदा विभागाचे विजय यादवनायब तहसीलदार राजू धांडे आदी उपस्थित होते

००००००

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल योजना


गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल योजना

Ø अनुसूचित जातीच्या नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 30 : चामड्याच्या वस्तू वा पादत्राणे दुरुस्ती व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हा-पावसात बसून आपली सेवा देत असतातया व्यावसायिकांना ऊन-वारा-पाऊस यापासून सरंक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावीयासाठी ग्रामपंचायतनगरपालिका क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहेया योजनेची व्याप्ती अ वर्ग व  ब वर्ग नगरपालिका आणि छावणीक्षेत्र (कॅन्टोंमेंटबोर्डव महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा वाढविण्यात आली आहे.

त्यानुषंगाने अनुसूचित जातीच्या गटई कामगारांचे आर्थिक उन्नती होण्यासाठी गटई स्टॉल योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण चंद्रपुर या कार्यालयाकडे उपलब्ध आहेतरी या योजनेचा अनुसूचित जातीच्या गटई कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

पात्रतेचे निकष : 1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुजाती संवर्गातील असावा. 2. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागासाठी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. 3. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. 4. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायतनगरपालिका, छावणी बोर्ड यांनी त्यास भाड्यानेकराराने खरेदी अगर मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी.

आवश्यक कागदपत्रे : 1. अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला 2. मागील संपलेल्या आर्थिक वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला 3. शाळा सोडल्याचा दाखला 4. रेशन कार्डाची झेरॉक्स (साक्षांकित प्रत) 5.आधार कार्डाची झेरॉक्स प्रत 6. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहेती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांनी भाड्याने/कराराने/खरेदीने/स्व:मालकीची असल्याबाबतची भाडेचिठ्ठीकराराची प्रत किंवा खरदी खताची साक्षांकित प्रत 7. ग्रामसेवकसचिव यांचे गटई काम करीत असल्याचे प्रमाणपत्र 8. अर्जदार रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करीत असल्याबाबतचे ग्रामपंचायत/नगरपालिकेचे व्यवसाय प्रमाणपत्र व या जागेवर बसून काम करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र व्यवसाय करतानाचा पोस्टकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे 9. अधिवास प्रमाणपत्र.

 अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यकआयुक्तसमाज कल्याण कार्यालय चंद्रपुर येथे सादर करावा. अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर येथे तसेच 07172 – 253198 वर संपर्क करावा.

००००००

जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


 जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Ø कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

चंद्रपूरदि. 30 : अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भूमिहीन कुटुंबाला कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, त्यांना करण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून  द्यावयाची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज सादर करावेतजमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी  करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मूल्य निश्चित करण्यात येईल.

अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव नमुना आठपरिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे  कुटुंबातील सख्खे भाऊपत्नीमुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतज‍मिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही.

जमिनीच्या खरेदी प्रक्रीयेमुळे कोणतीही  नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टंप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावेसदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष 31 ऑगस्ट 2025 पर्यंत संपर्क साधावाअसे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित


विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

Ø माजी सैनिक पत्नीपाल्य यांनी अर्ज करण्याचे आवाहन 

चंद्रपूरदि. 30 :   सन 2024-25 या वर्षासाठी आक्टोबर महिन्यात विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असून सदर बैठकीमध्ये सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणांची छाननी करून विशेष गौरव पुरस्कार देण्याचे नियोजन आहेत्याकरीता माजी सैनिक पत्नी पाल्य यांनी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या परिक्षेत 90 टक्के  व 12 वीच्या परिक्षेत 85 टक्के  पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या दहा माजी सैनिकविधवा यांच्या पाल्यांना तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक पत्नी पाल्य यांना एकरकमी 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.  IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक /विधवा यांच्या पाल्यांना 25 हजार रुपये गौरव पुरस्कार देण्यात येईल.

तसेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडूसाहित्य संगीतगायनवादननृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार वीजेतेयशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारेसंगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारेपूर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारेतसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इयांना अशा कार्याबद्दल त्यांचा सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कारजिल्हा सैनिक कल्याण विभागपुणे यांच्या मार्फत प्रदान करण्यात येणार आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक विधवांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी त्यांनी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावेत्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाहीयाची सर्व संबंधित माजी सैनिक विधवांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

माझी शाळा, माझा स्वाभिमान' उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 माझी शाळामाझा स्वाभिमानउपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

            चंद्रपूरदि. 30 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माझी शाळामाझा स्वाभिमान हा उपक्रम नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 1 ते थी साठी Teaching at the Right Level ही पद्धतइयत्ता 5 ते वी साठी तिचा विस्तारित वापर आणि इयत्ता 8 ते 12 वी साठी कृतीशील धडानियोजन आधारित अध्यापन पद्धती राबविण्यात येत आहेया पार्श्वभूमीवर चंद्रपूर व चिमूर प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमधील उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयचंद्रपूर येथे नुकतेच करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते करण्यात आलेया प्रशिक्षण शिबिराला सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षणश्रीबोंगीरवार, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या मास्टर ट्रेनर सरस्वती रायशिक्षामित्र अमोल सातारकर उपस्थित होतेप्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची चाचणी कशी घ्यावीत्यानंतर त्यांच्या शैक्षणिक गटांची रचना कशी करावीआणि त्या गटांनुसार अध्यापन कसे करावे, यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. Teaching at the Right Level ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रगतीशी निगडित असूनतिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध प्रात्यक्षिके आणि गतीविधींच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये बेसिक इंग्रजी बोलण्याची आवड व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांना विशेष कौशल्ये शिकवण्यात आलीयात सर्व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवलाप्रशिक्षणातून मिळालेल्या नव्या माहितीचा प्रभावी उपयोग आपल्या वर्गामध्ये करण्याची शिक्षकांनी तयारी दर्शवली.

 ‘माझी शाळामाझा स्वाभिमान या उपक्रमामुळे चंद्रपूर आणि चिमूर प्रकल्पातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावेलतसेच शिक्षकांना नव्या अध्यापन कौशल्यांची जाण मिळेलअसा विश्वास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी व्यक्त केला.

००००००

वैधमापन शास्त्र विभागातर्फे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार


वैधमापन शास्त्र विभागातर्फे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार

चंद्रपूरदि. 30 : वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणेलोकसंपर्क हढ करणे आणि ग्राहक तक्रारींचेशंकेचे व सुचनेचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने उपनियंत्रकवैधमापन शास्त्र कार्यालय चंद्रपुरच्या वतीने महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार आहे.

सामान्य ग्राहकग्राहक संघटनापॅकबंद वस्तुचे उत्पादक/पॅकर/आयातदार/किरकोळ विक्रेते व व्यापारी तसेच वजन व मापाचे परवाना धारक उत्पादकदुरुस्तक व विक्रेते यांच्यासाह प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी दुपारी ते 4 वाजेपर्यंत उपनियंत्रकवैधमापन शास्त्रचंद्रपुर यांचे कार्यालयरोहीत पेट्रोल पंपाजवळदुर्गापुर रोडतुकुमयेथे आयोजित करण्यात येत आहेतरी सर्व हितधारकांनी उपस्थित राहावेअसे  आवाहन प्रउपनियंत्रकजि.वा.मोरे यांनी केले आहे.

००००००

Tuesday, 29 July 2025

एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी भव्य ‘रेड रन मॅरेथॉन’ संपन्न


 एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी भव्य रेड रन मॅरेथॉन’ संपन्न

Ø चंद्रपूरातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभागराज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूरदि. 29 : एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीसाठी आज जिल्ह्यात भव्य रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबईजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.

जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकरजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडजिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार आणि क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.

युवक गटामध्ये भूषण आस्वले यांनी प्रथम क्रमांकसाईनाथ पुंगाटी यांनी द्वितीय क्रमांक व रोशन नैताम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर युवती गटात श्रद्धा थोरात प्रथमसाक्षी पोलोजवार द्वितीय आणि आचल कडुकर तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या.

विजेत्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यापैकी निवडक स्पर्धकांना 12 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे श्री. पानगंटीवार यांनी सांगितले.

स्पर्धेचे मुख्यगुणलेखक म्हणून  रोशन भुजाडेदर्शन माशीरकरभुमेश्वर कन्नमवार यांचे योगदान लाभले. पंच म्हणून आदर्श चिवंडेनावेद खानसौरभ कन्नाके व ऋतिक धोडरे यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे संचालन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थानोबल शिक्षण संस्थापॅन इंडिया आणि क्रॉईस्ट हॉस्पिटल सोसायटी यांचा मोलाचा सहभाग लाभला.

००००००

Monday, 28 July 2025

डीएलएड प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरी


 डीएलएड प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरी

चंद्रपूरदि. 28 : डीएलएड प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 च्या तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्या असून रिक्त जागेवरील प्रवेशाकरिता विशेष फेरी 25 ते 29 जुलै दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुरू झाली आहे. 12 वी उतीर्ण पात्र विद्यार्थांनी पूर्वीप्रमाणेच www.maa.ac.in या संकेत स्थळावर जाऊन स्वतःचा अर्ज भरावाअर्ज Approve झाल्यानंतर स्वतःच्या लागीन मधून प्रवेश निश्चित करावायापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरलेला आहे, परंतु प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश शुल्क भरण्याची आवशक्यता नाहीअधिक माहितीकरिता www.maa.ac.in या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉविनित मत्ते  यांनी कळविले आहे.

०००००००

माजरी पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मोटार सायकलींचा विक्री लिलाव

 

माजरी पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मोटार सायकलींचा विक्री लिलाव

चंद्रपूरदि. 28 : पोलिस स्टेशन माजरीयेथे बरेच कालावधीपासुन जमा असलेली जंगम मालमत्तेबाबत कोणताही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने एकूण 37 मोटार सायकल, (शासकीय किंमत लक्ष 88 हजार 210 रुपयेयांचा लिलाव होणार आहे. नमुद वाहने टेंडरद्वारे जिथे आहे तिथे वाहनाचे इंजिन व चेचिस नंबर मिटवून व वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहेत्याकरीता इच्छुक खरेदीदार यांच्याकडून सिलबंद टेंडर मागविण्यात आले आहे.

वाहने परिक्षणाची तसेच अनामत रक्कम व नोंदणी तारीख 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत अनामत रक्कम भरावी लागेललिलाव 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी यावेळेत होईल.

लिलावाच्या अटी व शर्ती : वरीलप्रमाणे नमुद केलेल्या जंगम मालमत्तेची जशी आहे तशी जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहेतशी विक्री केली जाईललिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाबाबत तपशिलवार अटी व शर्ती वाचुन  दाखविण्यात येतीलविक्री रकमेच्या 10 टक्के रक्कमेचा (अनामतभरणा केल्यावर लिलाव बोली बोलुन झाल्यानंतर ज्यांचे नावाने सदर वाहनाचा लिलाव मंजुर होईलत्या खरेदीदारास उर्वरित रक्कमचा भरणा त्वरीत लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईलजे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहे (ज्याचे नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.) तेथ विक्री रक्कमेच्या 10 टक्के रकमेचा (अनामतभरणा करतील व फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावामध्ये प्रवेश मिळणारत्याचप्रमाणे अनामत रक्कमेचा भरणा करतांना त्याचे प्रमाणपत्र ची आधारकार्डची झेरॉक्स प्रत्त सादर करावी लागेल

सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्विकारणे न स्विकारणे लिलाव कायम करणेपुढे ढकलणे किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता निर्णय घेणे, हे सर्व अधिकार ठाणेदारपोलीस स्टेशन माजरी यांचे राहतील याची नोंद घ्यावीअसे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी कळविले आहे.

००००००

Sunday, 27 July 2025

'महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू...

 'महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य

मुंबईदि. 27 :  बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविणेहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी  विदर्भातील अशा बालकांवर  उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत त्यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या आवाहनाला  स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न आता मिशनमोडवर साकार होतांना दिसत आहे.

स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे. महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नसूनहजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.

या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा नागपूर येथे 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन हॉस्पिटलखापरीयेथून शुभारंभ होणार आहे.

या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील  संपूर्ण 11 जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदानउपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर नागपूरगोंदियाअकोलावर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास 700 मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो. यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येते. वेळीच उपचार केले नाहीत तर कान बधिर होणेबोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा  येऊ शकतो. तथापि या विकारावर उपचार असून 6-7 शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते. या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच संवेदशील नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावेयासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी केवळ उपचारच नव्हेतर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो कुटुंबांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे. अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या समस्येवर आता तज्ज्ञांच्या मदतीने प्रभावी उपचार मिळणार आहे.

स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यातील  मुलांमध्ये जन्मजात आलेले दुभंगलेले होठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण नक्कीच जागणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

00000

Friday, 25 July 2025

‘मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या शस्त्रक्रिया मोहिमेचा शुभारंभ



मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र या शस्त्रक्रिया मोहिमेचा शुभारंभ

चंद्रपूरदि. 25 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 22 जुलै ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहेदूरदृष्यप्रणालीद्वारे आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकरयांच्या हस्ते राज्यस्तरीय उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय येथेसुध्दा सदर मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे, उद्घाटक म्हणून डॉमंगेश गुलवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून, अतिजिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकरजिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉतारासिंग आडेनिवासी वैद्यकिय अधिकारी डॉहेमचंद कन्नाकेनेत्र शल्य चिकित्सक डॉउल्हास सरोदेडॉजिनी पटेलविशाल निंबाळकर उपस्थित होते.

मोतीबिंदुची वाढती संख्या व सर्वसामान्य जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टी क्षीणता कार्यक्रम अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात एकूण 98 मोतिबिंदु शस्त्रक्रिया करून शुभारंभ करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉचिंचोळे म्हणाले, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात 58 शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून हजार मोतिबिंदु शस्त्रकिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉतारासिंग आडे यांनी केलेसंचालन नेत्रचिकित्सा अधिकारी निशा चांदकेरांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉहेमचंद कन्नाके यांनी मानले. यावेळी मेट्रन माया आत्राम मेट्रन, प्राचार्य , पुष्पा पोटे,  मंदा बोरकरमंगला वरखड़े, सुजाता मंडलमाधुरी कुळसंगेयोगेंद्र इंदोरकरनयना चौकेदिपक डंबारे, विकास वाढईअनिल मल्लोजवार तसेच कार्यालयीन कर्मचारी व नर्सिंग स्कूलचे प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

००००००

4 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन


ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

चंद्रपूरदि. 25 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

ऑगस्ट महिण्याचा पहिला सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी येत असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे करण्यात येईलजिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी 2 प्रतीत अर्ज सादर करावाव तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईलअसे प्रशासनाने कळविले आाहे.

००००००

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई


अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

चंद्रपूरदि. 25 : समाज कल्याण विभागाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती  योजनेअंतर्गत राज्यातील कनिष्ठवरिष्ठव्यावसायिकबिगर व्यावसायिक अनुदानित महाविद्यालयांमध्ये  शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृती प्रदान केली जातेनागपूर विभागात दरवर्षी सुमारे 70 हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात.

सन 2025-26 सत्रामध्ये काही महाविद्यालयांकडून प्रवेशाच्या वेळी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहेहे शासन  निर्णयाचे उल्लंघन आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, पात्र विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क घेता कामा नये.

शिष्यवृत्ती योजना सुरळीतपणे व वेळेवर अंमलात आणण्यासाठी महाडीबीटी ही संगणकीय प्रणाली  विकसित करण्यात आली असूनया प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती  थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातेयामुळे विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना आवश्यक निधी  वेळेत उपलब्ध होतो. काही महाविद्यालयांकडून शिक्षण शुल्काची मागणी  केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेतयाबाबत शासनाने सबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क घेणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्रांची अडवणूक करणाऱ्या नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईलअशा स्पष्ट सुचना नागपूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी दिल्या आहेत.

००००००