Search This Blog

Tuesday, 7 April 2026

महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी प्रशासनाचा पुढाकार


 महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी प्रशासनाचा पुढाकार

Ø जिल्ह्यातील कार्यालयामध्ये पॉश ऑडिट

चंद्रपूरदि. 07 : जिल्ह्यात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंधमनाई आणि निवारणअधिनियम, 2013 (पॉश ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी तसेच कार्यस्थळी महिलांना सुरक्षितसन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध व्हावेया उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीयमहामंडळ व खाजगी कार्यालयामध्ये संबंधित विभाकडुन पॉश ऑडिट राबविण्यात येणार आहेया उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे.

पॉश ॲक्ट अंतर्गत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करणेसमिती फलक लावणेकर्मचाऱ्यांना कायद्याबाबत प्रशिक्षण देणेकार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक आहेतसेच शी बॉक्स’ पोर्टलवर संबंधित कार्यालयाच्या नोंदीसह अंतर्गत समितीची माहिती अद्यावत करणे आवश्यक आहेया पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये या तरतुदीची प्रभवी अंमलबजावणी होत आहे का ?  याची सखोल पडताळणी पॉश ऑडिट’ द्वारे करण्यात येणार आहे

सहायक आयुक्त कामगार विभागाकडून खाजगी कार्यालयांचे नियमित ऑडीटसह पॉश ऑडिट करण्यात येणार असून त्यानंतरच परवाना नुतनीकरण केले जाणार आहेत्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी व म..वि.उपअभियंता हे देखील खाजगी शाळा व उद्योगकारखाने यांचे पॉश ऑडिट करणार आहेया कायद्याच्या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कार्यालयावर 50 हजारपर्यंत दंडात्मक कार्यवाहीसह आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

            चंद्रपूरदि. 07 :  भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे ते 13 मे 2026 या कालावधीत कोर्स आयोजित करण्यात येत आहेसदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवासभोजनआणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

 तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 27 एप्रिल 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावेइच्छुक उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 या मोबाईल नंबर वर SSB-६५ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हॉट्सॲप द्वारे पाठवले जातीलमुलाखतीकरीता प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट सोबत घेऊन यावी.

एस.एस.बीकोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी 1) कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. 2) एन.सी.सीस्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बीमुलाखतीसाठी कॉललेटर असावे. 3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बीमुलाखतीसाठी कॉललेटर असावेयापैकी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहेअसे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

००००००

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती 30 एप्रिल पर्यंत भरण्याचे आवाहन

 

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती 30 एप्रिल पर्यंत भरण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 07 :  सेवायोजन कार्यालये कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील शासकीयनिमशासकीयतसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचा-यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुषंगाने जानेवारी ते मार्च 2026 अखेर संपणाऱ्या तिमाहिची माहिती नमुना ई.आर.-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम ऑनलाईन पध्दतीने एप्रिल 2026 पासून सुरू झाले आहेजिल्ह्यातील सर्व आस्थापनांना कार्यालयाकडून यापूर्वीच युझर आयडी व पासवर्ड देण्यात आलेले आहेतचत्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करून प्रत्येक आस्थापनांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

तिमाही विवरणपत्र सादर करावयाची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहेहे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावेअशाप्रकारे ज्या आस्थापनेची नोंदणी नसल्यास त्यांनी वरील पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी किंवा नोंदणी असल्यास आस्थापनांनी तात्काळ माहिती अद्ययावत करावीअसे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी केले आहे.

यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास chandrapurrojgar@gmail.com यावर तसेच दूरध्वनी क्र. 07172- 252295 वर संपर्क करावाअसे सहायक आयुक्त अ.लातडवी यांनी कळविले आहे.

००००००

नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन



 नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन

चंद्रपूर नागपूरदि07 सिताबर्डीनागपूर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश थोरात यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.

भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार  तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होऊन मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकमेव ग्रामीण बँक म्हणून नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीगडकरी यांनी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केलेग्रामीण व अर्ध-शहरी भागातील नागरिकशेतकरी तसेच लघुउद्योजकांना सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण बँकेसारख्या उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अत्याधुनिक सुविधा तसेच डिजिटल बँकिंगच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेतयामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून बँकेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येणार आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी संवाद साधताना श्रीगडकरी यांनी कृषी पायाभूत सुविधांसाठी बँकेने विशेष मदत करावीतसेच शेतीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी आवश्यक वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यावर देखील भर दिला.

याप्रसंगी बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीथोरात यांनी देखील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शेती व शेतीपूरक उद्योगासोबतच एमएसएमई उद्योग, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि विविध कर्ज योजना तसेच आकर्षक बचत योजना व डिजिटल बँकिंग सुविधांच्या माध्यमातून सर्वच स्तरातील ग्राहकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रीय व्यवस्थापक गजानन सानप यांनी  तर आभार उपक्षेत्रीय व्यवस्थापक जितेंद्र चव्हाण यांनी मानलेकार्यक्रमाला आमदार श्रीकृष्ण खोपडेबँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य सरव्यवस्थापक मिलिंद घारड, बँक ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे विभागीय व्यवस्थापक राहुल वाघमारे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक श्रीराम भोर, बँकेचे ग्राहक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते००००००००

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


 माझं गावआरोग्यसंपन्न गाव’ राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई / चंद्रपूरदि. 07 : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माझं गावआरोग्यसंपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.  यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिलीअभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य शासनाने ‘माझं गावआरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षमरोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहेलोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावीहा शासनाचा मानस असूनगावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणेस्वच्छताशुद्ध पाणीपुरवठासांडपाणी व्यवस्थापनपोषणतसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहेमाता-बाल आरोग्यमानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यविभागजिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असूनठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना आरोग्यसंपन्न गाव म्हणून गौरविण्यात येणार आहेयासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असूनग्रामपंचायतजिल्हा परिषदपंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना 65.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

माझं गावआरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहेया उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगीसशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

००००