Search This Blog

Thursday, 19 March 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी





जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी

चंद्रपूरदि. 19 : चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेची पूर्वतयारी व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी माता महाकाली मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शनमनपा आयुक्त अकुनुरी नरेशचंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार विजय पवारमनपा उपायुक्त संदीप चिद्रावार माता महाकाली मंदिर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागआरोग्य विभागचंद्रपूर शहर महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेमाता महाकाली यात्रेसाठी इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांचा प्रवेश आणि बाहेर निघण्याचा मार्ग स्वतंत्र असावा. गर्दी व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन प्रशासनाने करावे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात यावे. यात्रा कालावधीत संपूर्ण मंदिर परिसराची साफसफाई नियमितपणे करावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  असावी.

किचन स्थळ हे मंदिर परिसर आणि दुकानांच्या दूर ठेवावे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भाविकांना बसू देऊ नये. सर्वांनी रांगेत दर्शन घेऊन बाहेर निघावे. आरोग्य विभागाने प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच २४ तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवावी. बांधकाम विभागाने काही दुरुस्तीची कामे असल्यास आताच करून घ्यावीतअशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी घाट परिसराची सुद्धा पाहणी केली.

००००००

Wednesday, 18 March 2026

पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शन



पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शन

Ø जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजन

Ø शिक्षकग्रामसेवकआरोग्य कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती

चंद्रपूरदि. 18 : जिल्हा महिला व बालविकास कार्यालयजिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या मार्गदर्शनात बीजीएम कार्मेल अकादमी येथे मंगळवारी पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंध आणि महिला बालविकास विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णीजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळेजिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणेउपशिक्षणाधिकारी गणेश येरणेबालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बारसकरसदस्या ज्योत्स्ना मोहितकरवनिता घुमेबीजीएम कार्मेल अकादमीचे प्राचार्य जेसन जेकबजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुलकित सिंह म्हणालेबालक देशाची संपत्ती असून बालकाचे संरक्षण आपली प्रथम जबाबदारी आहेबालकांच्या संरक्षणासाठी शासन प्रशासन तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका संवेदनशीलपणे पार पाडावीअसे आवाहन केलेमुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णीयांनी मार्गदर्शन करतांनाबालकांची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असून सर्वांनी कायद्याला अनुसरून कार्यवाही केलीच पाहिजेयासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व पोलिस यांना सहकार्य करावेसुधीर इंगळे यांनी बालविवाह व पोक्सो कायदा समजावून सांगितला व बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन केलेतसेच ग्राम/वार्ड बाल संरक्षण समितीची भूमिका विषद केली.

प्रास्ताविकातून मिनाक्षी भस्मे यांनीबालकांच्या कार्यक्षेत्रात कार्य करणारे अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची असून सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने कार्य करून चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त तसेच बालस्नेही बनविण्याचा संकल्प करू या असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार अजय साखरकर यांनी मानलेयावेळी विधी अधिकारी अनिल तानलेपरिविक्षा अधिकारी अतिशकुमार चव्हाणअभिषेक मोहुर्लेशशिकांत मोकाशेजिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईनजिल्हा बाल संरक्षण कक्षसखी वन स्टॉप सेंटररूद्या संस्था आदींनी मोलाची भुमिका बजावली.

००००००

Tuesday, 17 March 2026

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

चंद्रपूरदि. 17 : जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे राबविण्यात येणाऱ्या चांदा ज्योती सुपर 100 या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये इयत्ता 10 वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना IIT/JEE/NEET या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षे मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

 या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत प्रथम चाळणी परीक्षा दि. 31 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रथम चाळणी परीक्षेत 40 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड परीक्षा दि. 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12.00 ते 2.30 या वेळेत भवानजीभाई चव्हाण हायस्कूलमुल रोडचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत उपलब्ध राहणार असून प्रश्न इयत्ता 10 वीच्या बीजगणित (Algebra), भूमिती (Geometry) आणि विज्ञान (Science) या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम निवड परीक्षेला उपस्थित राहावेअसे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

Monday, 16 March 2026

जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव

 जिल्हास्तरीय कृषीपशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव

Ø चांदा क्लब ग्राऊंड येथे 20 ते 24 मार्च दरम्यान आयोजन

चंद्रपूरदि. 16 : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागांच्या योजनातंत्रज्ञान व उपक्रमांची माहिती मिळावी तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीला चालना मिळावी या उद्देशाने जिल्हास्तरीय कृषीपशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव-2026 चे आयोजन करण्यात आले आहेहा पाच दिवसीय महोत्सव 20 ते 24 मार्च 2026 दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडचंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेहा महोत्सव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग (जिल्हा परिषदतसेच महिला आर्थिक विकास महामंडळचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवात सेंद्रीय व बिगर सेंद्रीय शेतमालाची विक्रीशेतकरी उत्पादक कंपन्यामहिला स्वयं सहाय्यता गट व बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री तसेच कृषी व पशुपालन विषयक माहितीपर स्टॉल उभारण्यात येणार आहेतएकूण 325 स्टॉल उभारण्यात येणार असून त्यामध्ये शासकीय योजनाकृषी निविष्ठाकृषी प्रात्यक्षिकेकृषी यांत्रिकीकरणपशु-पक्षी प्रदर्शनखाद्य स्टॉल तसेच चर्चासत्रे व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महोत्सवात सूक्ष्म सिंचन अभियानएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानजलयुक्त शिवार अभियानसेंद्रीय शेतीश्री पद्धतीची भात लागवड यांसारख्या उपक्रमांची माहिती व प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेततसेच मधुमक्षिका पालनमत्स्य व्यवसायपशुसंवर्धनरेशीम उद्योग आदी कृषी संलग्न क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेयाशिवाय पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देवणीडांगीखिल्लारलालकंधारीगवळाऊकठाणी यांसारख्या गाईंच्या जातीगीर व थारपारकर देशी गायी तसेच जर्सी संकरीत गायीनागपुरीजाफ्राबादीपंढरपुरी व मुर्रा म्हशीतोतापरीउस्मानाबादीबेरारीबिटलकच्छीबारबेरी व आफ्रिकन बोअर या शेळ्यांच्या जाती तसेच कुक्कुट व बदकांचे विविध प्रकार प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

महोत्सवात अनुभवी व पुरस्कारप्राप्त शेतकरीशास्त्रज्ञ व उद्योजक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानकृषीविषयक परिसंवाद तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन कार्यक्रमही होणार आहेतसांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘पैसारे पैस’ हे दोन अंकी नाटक तसेच महारोगी सेवा समितीआनंदवन यांच्या स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेया महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांचे तंत्रज्ञानअद्ययावत कृषी उपकरणे तसेच विविध योजनांची माहिती मिळणार असून शेतकरी उत्पादकांकडून शेतमालाची थेट वाजवी दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीनागरिक व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रकल्प संचालककृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीप्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाउपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तसेच महिला आर्थिक विकास महामंडळचंद्रपूर यांनी केले आहे.

०००००००

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा आढावा





राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा आढावा

चंद्रपूरदि. 16 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर यांनी सोमवारी (दि. 16) अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक सुनीलकुमार बाबू उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,  मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, खाजगी सचिव क्रांती कुमार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अधिक्षक अभियंता (महावितरण) संध्या चिवंडे, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी वड्डेपल्ली रामचंदर म्हणाले, अनुसूचित जातीच्या नागरिकांना घरपट्टे किंवा घरकुल प्राधान्याने द्यावे. रोजगार, स्वयंरोजगारासाठी बँकांनी त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने पाठपुरावा करावा. प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी आणि मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. अनुसूचित जातीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उद्योग विभागाने त्यांचे प्रस्ताव त्वरीत बँकांकडे पाठवावे. अत्याचाराच्या घटना घडल्या तर त्यावर पोलिस विभागाने त्वरीत पीडितांना न्याय द्यावा. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती द्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी रामचंदर यांनी अनुसूचित जातीच्या मुलामुलींची वसतीगृह प्रवेशस्थिती, शाळांची संख्या, केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान, आरोग्य आणि पोषण, ॲक्ट्रोसिटीची प्रकरणे, ग्रामीण पाणी पुरवठा, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, बँकांची कर्ज प्रकरणे आदींचा आढावा घेतला.

००००००

बांबू सखींच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मिळणार हक्काचा रोजगार

 


बांबू सखींच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मिळणार हक्काचा रोजगार

Ø चिचपल्ली येथे 7 दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

चंद्रपूरदि. 16 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीच्या वतीने 'कॅम्पाप्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागीर समुदायाचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहेया उपक्रमांतर्गत 'बांबू सखीतयार करण्यासाठी सात दिवसीय 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षणनुकतेच यशस्वीरित्या पार पडले.

विशेष प्रशिक्षण सत्रामध्ये मोहरलीचोरगावनिंबाळाबल्लारशावरवट आणि घुग्गुस या गावातील प्रशिक्षित बांबू सखी आता गावागावात जाऊन इतर महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देतीलयामुळे ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर न पडताघरबसल्या सन्मानाने काम करण्याची आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलावन परिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे सत्र पार पडलेप्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन आणि सत्र संचालक म्हणून बी.आर.टी.सी.च्या पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी जबाबदारी पार पाडलीया सात दिवसांच्या कालावधीत संतोष बजाईत आणि गोविंदा आत्राम यांनी प्रशिक्षक म्हणून महिलांना बांबूकामातील विविध तांत्रिक कौशल्ये आणि आधुनिक डिझाइन्सचे प्रशिक्षण देऊन कुशल केले.

प्रशिक्षणाचे उद्दिष्ट : पारंपारिक बांबू कलेला आधुनिकतेची जोड देणे ग्रामीण महिलांना 'बांबू सखीम्हणून विकसित करून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणेस्थानिक स्तरावर बांबू उद्योगाला चालना देऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणेहा आहेया उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांबू हस्तकलेचे नवे जाळे निर्माण होणार असून महिलांच्या आर्थिक स्तरात मोठी सुधारणा होईलअसा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

०००००००

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन


आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Ø 23 मार्च पुर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 16 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एसटी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहेतहे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता माहिती  मार्गदर्शन केंद्र पहिला माळाचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन एप्रिल ते 15जुलै 2026 या कालावधीत म्हणजेच सुमारे साडेतीन महिन्यांचे असेलवर्ग-3  वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईलइच्छुक उमेदवारांनी 23 मार्च 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधारकार्डशैक्षणिक प्रमाणपत्रेजातीचे प्रमाणपत्र  बँक पासबुकछायाप्रतींसह नोंदणी फॉर्म सादर करावानोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 24 मार्च  रोजी घेण्यात येईलतर निवड यादी 25 मार्च  रोजी प्रसिद्ध केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणितइंग्रजीसामान्यज्ञानबुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातीलनिवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच तसेच प्रतिमाह हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहेअधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मोक्र. 9764580986  यांच्याशी अथवा कार्यालयासी संपर्क साधावा.

००००००

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार

मुंबईचंद्रपूरदि. 16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षमतंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहेकृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय (LEHS AI Unit) या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससार्वजनिक आरोग्य  कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृनवजात  बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहेराज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदारवेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

डिजिटल महाराष्ट्र आता पुढील टप्प्यात प्रवेश करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता सार्वजनिक आरोग्यासाठी ‘फोर्स मल्टिप्लायर’ ठरणार आहेवाधवानी एआयच्या सहकार्याने एआय सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य  कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कीक्षयरोगप्राथमिक आरोग्य सेवा आणि मातृ-बाल आरोग्यासाठी एआय साधनांचा वापर केल्यास लवकर निदानसुलभ सेवा आणि अग्रिम कर्मचाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळेलही भागीदारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम  सक्षम बनवेल. 

वाधवानी एआयचे प्रमुख शेखर शिव सुब्रमणियन यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले कीमहाराष्ट्र शासनाबरोबरची ही भागीदारी नवोन्मेषसमता आणि दीर्घकालीन परिणाम साधणाऱ्या आरोग्य सुधारणांसाठी महत्त्वाची ठरेल.

या सामंजस्य करारामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा प्रभावी वापर : या उपक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांमध्ये उपचार सोडून देण्याचा धोकाउपचारातील अडथळे  मृत्यूची शक्यता उपचाराच्या सुरुवातीलाच ओळखण्यासाठी एआय आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहेत्यामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांवर वेळेत लक्ष देऊन योग्य उपचार करता येणार आहेत.

‘Cough Against TB’ या एआय आधारित ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजाचे विश्लेषण करून क्षयरोगाची प्राथमिक ओळख आरोग्य संस्थांमध्ये जलदगतीने करता येणार आहे.

याशिवायउपगाव पातळीवर (500 मी. × 500 मी.) क्षयरोगाचा धोका दर्शविणारे व्हल्नरेबिलिटी मॅपिंग तयार करण्यात येणार असूनलोकसंख्या घनताआरोग्य सुविधाप्रदूषणकुपोषण यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सक्रिय रुग्ण शोध (ACF) मोहिमा अधिक परिणामकारक रितीने राबविता येणार आहेत.

-हेल्थ  प्राथमिक आरोग्य सेवांना गती : राज्याच्या -संजीवनी टेलिमेडिसीन सेवेमध्ये एआय आधारित Clinical Decision Support System (CDSS) समाविष्ट करण्यात येणार आहेयामुळे डॉक्टरांना अचूक निदान  रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहेमधुमेही रुग्णांसाठी ‘मधुनेत्रा’ या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे रुग्णांना संदर्भित करता येणार आहे.

हेल्थ वाणी’ या एआय आधारित संवाद सहाय्यकाच्या माध्यमातून आशाएएनएम यांसारख्या अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवरच प्रशिक्षणमार्गदर्शन  प्रमाणित माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

मातृ  बाल आरोग्यासाठी अभिनव तंत्रज्ञान. ‘शिशु मापन’ या एआय आधारित ॅप्लिकेशनमुळे केवळ स्मार्टफोन  साध्या मोजमापाच्या साधनांच्या सहाय्याने नवजात शिशूचे वजनलांबीडोके  छातीचा घेर मोजणे शक्य होणार आहेघरभेटीद्वारे 42 दिवसांपर्यंत नवजात शिशूंची काळजी अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.

नेतृत्वाचे मत

समावेशक  तंत्रज्ञानाधारित आरोग्य महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल : सध्या देशभरात वाधवानी एआयच्या उपाययोजनांद्वारे 15 कोटीहून अधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचत असूनआरोग्यशेती  शिक्षण क्षेत्रात सामाजिक परिवर्तन घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहेया सामंजस्य करारामुळे  राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अधिक सक्षमसमावेशक आणि लोककल्याणकारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

०००००००