Search This Blog

Wednesday, 4 March 2026

भुमी अभिलेख कार्यालयाकडून विविध ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन

 

भुमी अभिलेख कार्यालयाकडून विविध ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन

चंद्रपूरदि. 04 : भूमि अभिलेख विभागाच्या विविध योजना व सेवांची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान विविध ठिकाणी घेण्यात येणार आहेया शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख यांनी केले आहे.

वरोरा तालुक्यात या ठिकाणी होणार महाराजस्व अभियान : 1) दि. 7 मार्च रोजी सकाळी 10 वासार्वजनिक वाचनालय तलाठी कार्यालय समोरखांबाडा 2) 7 मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृह टेंभुर्डा 3) 14 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाआनंदवन 4) 14 मार्च रोजी ग्रामपंचायत परिसरतुळाना 5) 10 एप्रिल रोजी शेतकरी भवनमांढेळी 6) 10 एप्रिल रोजी त्रिमुर्ती देवस्थान सभागृहखरवड 7) 17 एप्रिल रोजी गुरुदेव समाज भवनखेमजई 8) 17 एप्रिल रोजी लक्ष्मी नारायण देवस्थानचारगाव बुं येथे महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भद्रावती तालुक्यात या ठिकाणी होणार महाराजस्व अभियान : 1) दि. 7 मार्च रोजी सकाळी 10 वाहनुमान मंदीर परिसरनंदोरी 2) 14 मार्च रोजी ग्रामपंचायतमांगली रै 3) 10 एप्रिल रोजी ग्रामपंचायतचंदनखेडा 4) 17 एप्रिल रोजी किसान भवनघोडपेठ 5) 8 मे रोजी ग्रामपंचायत समाज भवनमुधोली 6) 15 मे रोजी नगर परिषद सभागृहभद्रावती येथे आयोजन.

सिंदेवाही तालुक्यात या ठिकाणी होणार महाराजस्व अभियान : 1) दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वामोहाळी (नलेश्वरयेथे 2) 14 मार्च रोजी नवरगाव येथे 3) 10 एप्रिल रोजी लोनवाही 4) 17 एप्रिल रोजी लोनवाही 5) 8 मे रोजी नगर पंचायतसिंदेवाही येथे आयोजन

उपअधिक्षक भूमि अभिलेख विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांमध्ये ई-रेकॉर्ड्सभु-नक्शा पोर्टलची माहितीनकाशे डाउनलोड प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहेनगर भूमापन व गावठाण भूमापनाशी संबंधित प्रलंबित फेरफार अर्ज निकाली काढणे तसेच इंप्तिस प्रणालीअंतर्गत ऑनलाईन फेरफार अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांतील प्रलंबित कमी-जास्त पत्रके तयार करणेपोटहिस्सा व आकारफोड प्रकरणांमध्ये अभिलेख दुरुस्ती-मोजणी 2.1 प्रणालीची माहितीमोजणी अर्ज प्रक्रिया व कार्यपद्धतीबाबत जनजागृती तसेच मोजणी अर्ज ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेतमोजणी प्रकरणातील ‘’ प्रत ऑनलाईन कशी उपलब्ध होते याची माहितीही दिली जाईल.

महाभूमी पोर्टलवरील ई-फेरफार-मोजणी-चावडी व ई-रेकॉर्ड सेवांचा वापरतुकडेबंदी कायद्यातील बदल तसेच भूमि अभिलेख विभागाच्या विविध योजना व सेवांची माहिती शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेया शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख तथा उप अधीक्षक वरोराभद्रावती आणि सिंदेवाही यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment