Search This Blog

Thursday, 5 March 2026

जनतेने महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी गौडा


 

जनतेने महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी गौडा

Ø मार्च रोजी मंडळ स्तरावर शुभारंभ

चंद्रपूरदि. 05 : सर्वसामान्य नागरिकशेतकरीविद्यार्थीमहिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत मार्च ते मे 2026 या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहेप्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर होणा-या या शिबिराच्या माध्यमातून योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहेत्यामुळे सर्व जनतेने महाराजस्व शिबिराचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानबाबत माहिती देतांना ते बोलत होतेयावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे उपस्थित होते.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम  गतिमान करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेया अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत थेट पोहचणार आहेयासाठी उपजिल्हाधिका-यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेशासकीय लाभापासून कोणीही वंचित राहू नयेयासाठी जनतेने शिबिराचा लाभ घ्यावातसेच आपल्या महसूल विषयक अडचणींचे त्वरीत निराकरण करून घ्यावेअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

अभियानाचे उद्दिष्ट : 1. महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या दैनंदिन समस्या व तक्रारींचे त्वरित निराकरण करणे. 2. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींबाबत जनजागृती करणे. 3. महसूल सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करणे. 4. शासनाच्या विविध सुधारित धोरणांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे.

अभियानात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा : 1. भोगवटदार वर्ग जमिनींची तपासणी  करून पात्र प्रकरणांमध्ये वर्ग 1 मध्ये रुपांतर व अद्यावत 7/12 वितरण, 2. सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करून प्रलंबित नोंदीची दुरुस्ती व अभिलेख अद्ययावत करणे, 3. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन मंजुरी आदेश वितरण, 4. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करून अद्यावत करण्यात आलेल्या 7/12 वितरण, 5. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे 7/12 मधील इतर अधिकारातील नोंदी व शेरे तसेच नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जाविषयी फेरफार घेऊन अद्यावत 7/12 चे वाटप, 6. शाळांमधून विद्यार्थ्यांचे अर्ज संकलित करून प्रमाणपत्रांचे वितरण, 7. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीना उपलब्ध करून देणे, 8. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांना घरपट्टे वाटप. प्रलंबित फेरफार प्रकरणे सुनावणी करून निकाली काढणे, 9. 7/12 उताऱ्यातील  चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, डिजिटल 7/12 व अ उतारे तात्काळ उपलब्ध करून देणे, 10 लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न प्रमाणपत्ररहिवासी अधिवास प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रनॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी वाटप, 11. महसुल सुधारणा बाबत मार्गदर्शन, 12. इतर सेवा अंतर्गत ई-मोजणीअग्रीस्टॅकपीएम किसान योजनातक्रार निवारण सेवा,

येथे होणार मार्च रोजी समाधान शिबीर : 7 मार्च 2026 रोजी जिल्ह्यातील अजयपूर (ताचंद्रपूर), बेंबाळ (तामूल), पाथरी (तासावली), कोठारी (ताबल्लारपूर), खांबाडा /टेंभुर्डा (तावरोरा), नंदोरी बु. (ताभद्रावती), चौगान (ताब्रम्हपुरी), गिरगाव (तानागभीड), नेरी (ताचिमूर), मोहाळी नले (तासिंदेवाही), गंगाराम तळोधी (तागोंडपिपरी), गोवरी (ताराजुरा), गडचांदूर (ताकोरपना) आणि पाटण (ताजिवती) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment