वरोरा पोलिस स्टेशनमध्ये 56 वाहने जप्त
Ø बेवारस स्थितीतील वाहनांबाबत कागदपत्रांसह संपर्क करण्याचे
आवाहन
चंद्रपूर, दि. 23 : पोलिस स्टेशन, वरोरा यांच्या कार्यालयात
बरेच वर्षापासून बेवारस स्थितीत असलेले 50 मोटर वाहन (दुचाकी) 1 तिनचाकी व 5 चारकाची अशी एकुण 56 वाहन जमा करण्यात
आले आहे. वाहनाच्या मालकी हक्काबाबत आजपावेतो कोणीही वाहनधारक पोलिस स्टेशनला मुळ कागदपत्र
घेऊन हजर झाला नाही व वाहनाचे मुळ कागदपत्र सादर केले नाही.
तरी सदर वाहन ज्या कोणाच्या
मालकी हक्काचे असतील, त्यांनी पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन वरोरा यांच्या
कार्यालयात सक्षम पुराव्यासह या उद्घोषणा पत्राच्या प्रसिध्दीपासुन 60 दिवसाच्या आत दावा
दाखल करावा. विहीत कालावधीनंतर कोणचाही दावा/हक्क/तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे पोलिस निरीक्षक, वरोरा यांनी कळविले
आहे.
००००००
No comments:
Post a Comment