Search This Blog

Friday, 6 March 2026

अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

 


अर्थसंकल्प प्रतिक्रिया :

अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प

– पालकमंत्री डॉअशोक वुईके

राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहेशेतकरीशेतमजूरदलितआदिवासीमहिलादुर्बल घटक आदिंच्या विकासाचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला आहेकेंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच सामान्य नागरिकांचा विचार करून आर्थिक धोरणे राबवित असल्यामुळे लोकांचे जीवनमान सुकर झाले आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटमध्ये 21723 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहेयात राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनाशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळडॉएपीजे अबुल कलाम अमृत आहार योजनानमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानआदर्श आश्रमशाळाभगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनापंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आदींचा समावेश आहेराज्यातील जनतेला या अर्थसंकल्पामुळे दिलासा मिळणार आहे. – आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके

०००००००

No comments:

Post a Comment