Search This Blog

Saturday, 7 March 2026

गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप





गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप

Ø जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट

चंद्रपूर, (राजुरा) दि. 7 : महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची सुरुवात आज ७ मार्च २०२६ रोजी राजुरा तालुक्यातील मौजा गोवरी येथे करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी अचानक भेट दिली. या शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार  ओमप्रकाश गोंड यांनी केले. यावेळी विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

सदर शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेशनवीन रेशनकार्डजात प्रमाणपत्र तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. तसेच वर्ग-१ करण्यात आलेल्या जमिनीचे ७/१२ उतारे व दुरुस्ती केलेले ७/१२ उतारे लाभार्थींना प्रत्यक्ष देण्यात आले. विविध योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले व हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावेअसे सांगितले.

कार्यक्रमास गट विकास अधिकारी भागवत रेजीवाडउपअधीक्षक भूमिअभिलेख दत्तू सोनवणेपशुधन विकास अधिकारी श्री. तेलंगेनायब तहसीलदार श्रीमती पवारतसेच गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्यासह शेजारील ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढईबंधू कोडापे,  वनमाला कातकर,  पांडुरंग पोटे आदी उपस्थित होते. तसेच गोवरी मंडळातील सर्व तलाठीमंडळ अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.

0000000

No comments:

Post a Comment